व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स - Spring Rolls
Spring Roll in English वेळ: ३० ते ४० मिनिटे २० स्प्रिंग रोल्स साहित्य: २० स्प्रिंग रोल शीट्स - रेसिपीसाठी इथे क्लिक करा ३/४ कप कोब...
https://chakali.blogspot.com/2013/04/vegetable-spring-rolls.html
वेळ: ३० ते ४० मिनिटे
२० स्प्रिंग रोल्स
साहित्य:
२० स्प्रिंग रोल शीट्स - रेसिपीसाठी इथे क्लिक करा
३/४ कप कोबीचे पातळ काप
१/२ कप गाजराचे पातळ काप
१/४ कप पातीकांद्याचे पातळ काप
१/२ कप फरसबी, पातळ तिरके काप
१ मध्यम भोपळी मिरची, पातळ उभे काप
१/२ कप शिजलेल्या नुडल्स
२ टीस्पून लसूण, बारीक चिरून
१ टीस्पून आले, बारीक चिरून
२ टीस्पून सोया सॉस
१ टेस्पून तेल
१/४ ते १/२ टिस्पून अजिनोमोटो
१/४ टीस्पून मिरपूड
२ कप तेल स्प्रिंगरोल तळण्यासाठी
चवीपुरते मीठ
कृती:
१) कढईत १ टेस्पून तेल गरम करावे. त्यात आलेलसूण परतावे. फरसबी, पाती कांदा, गाजर, आणि भोपळी मिरची घालून साधारण ३० सेकंद मोठ्या आचेवर परतावे. सोय सॉस घालावा आणि मिक्स करावे.
२) नंतर मीठ, मिरपूड आणि कोबी घालून ३० सेकंद ढवळावे. आच बंद करून नूडल्स घालून मिक्स करावे. सारण एका बोलमध्ये काढून ठेवावे.
३) एक स्प्रिंगरोल शीट घेउन त्याच्या एका कडेला १ चमचा सारण ठेवावे. २ वेळा रोल करून डावी आणि उजवी बाजू आत फोल्ड करावी. पुढे रोल करत न्यावी. शेवटी पाण्याने किंवा मैदा+पाण्याच्या पेस्टने कड चिकटवून टाकावे.
४) अशाप्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवावे. तेल गरम करून मध्यम आचेवर रोल तळावेत.
स्प्रिंग रोल्स गरमच चिली सॉस बरोबर सर्व्ह करावे.
टीप:
१) स्प्रिंग रोल्स शीट विकतही मिळतात. यामुळे वेळ वाचेल. तसेच विकतच्या शीट्समुळे स्प्रिंग रोल्स जास्त कुरकुरीत होतात.
he spring roll sheet kuthe miltil
ReplyDeleteDukanat :p
Deletewell just kidding :)
Here is the link or you can just go through many websites on internet
http://importfood.com/nrga1222.html
hi vaidehi,
ReplyDeletecan you please post the recipe for macaroni cheese pasta (kid's favorite)...
thanks
Hi Vaidehi,
ReplyDeleteCan U please post the recipe of doughnut (eggless). My daughter love doughnuts.
Thanks for such lovely receipe I try most of your receip at home and follow your instructions.
ReplyDeleteI tried spring roll too and it's become yummy 😛
Thank you Bhagyashri
DeleteDoes it really matter if I do not add Ajinomoto?
ReplyDeleteAjinomoto is added in small quantity for to make it taste like restaurant. You can very well skip that.
DeleteHi Vaidehi, thanku for sharing this vegetable spring rolls recipe.
ReplyDelete