स्प्रिंग रोल रॅपर्स - Spring roll wrappers
Spring Roll wrappers in English वेळ: ३० मिनिटे २० स्प्रिंग रोल शीट्स साहित्य: १ कप मैदा १ टेस्पून साबुदाणा पीठ किंवा कॉर्न स्टार्च १ ...
https://chakali.blogspot.com/2013/04/spring-roll-sheets-wrappers.html?m=1
वेळ: ३० मिनिटे
२० स्प्रिंग रोल शीट्स
साहित्य:
१ कप मैदा
१ टेस्पून साबुदाणा पीठ किंवा कॉर्न स्टार्च
१ टीस्पून तेल
१/२ टीस्पून मीठ
१/२ कप आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्च
व्हेज स्प्रिंग रोल्सच्या पाककृतीसाठी इथे क्लिक करा.
कृती:
१) मैदा आणि १ चमचा कॉर्न स्टार्च, तेल, आणि मीठ एकत्र करावे. पाणी घालून मध्यमसर पीठ भिजवावे. १ तास झाकून ठेवावे.
२) मळलेल्या पीठाचे १८ ते २० लहान गोळे करावे. आरारूट पावडर किंवा कॉर्न स्टार्चवर एकदम पातळ पोळ्या लाटाव्यात.
३) तवा अगदी मंद आचेवर तापवावा. लाटलेल्या पोळ्या तव्यावर अगदी कच्च्या भाजाव्यात (प्रत्येक बाजू ५ सेकंद भाजावी). आपल्याला पोळी जास्त भाजलेली नकोय. जास्त भाजली गेली तर रोल वळता येणार नाहीत.
४) तयार रॅपर्स प्लेटमध्ये ठेवून वर टॉवेल ठेवावा. अशाप्रकारे रॅपर्स कच्चे भाजून घ्यावेत.
५) रॅपर्स त्याच दिवशी वापरावेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील ओलसरपणा कमी होतो आणि तुकडे पडतात.
Nutritional Info: (per piece) (Considering 20 pieces)
Calories: 32| Carbs: 6 g | Fat: 0 g | Protein: 1 g | Sat. Fat: 0 g | Sugar: 0 g
Post a Comment