गट्टा करी - gatta curry

Gatta Curry in English वेळ: ४० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: ::::गट्ट्यासाठी:::: ३/४ कप बेसन २ टेस्पून तांदूळ पीठ १ टीस्पून ज...

Gatta Curry in English

वेळ: ४० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
::::गट्ट्यासाठी::::
३/४ कप बेसन
२ टेस्पून तांदूळ पीठ
१ टीस्पून जिरेपूड
१ टीस्पून धणेपूड
२ टीस्पून लाल तिखट
१/४ चमचा हळद
दही (२ ते ३ टेस्पून)
२ टेस्पून तेल
१/२ टीस्पून बेकिंग सोडा
१ टीस्पून मीठ
::::करीसाठी::::
२ टेस्पून तेल
१/२ टीस्पून जिरे
१ टीस्पून धने, भरड कुटलेले
१/२ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून लसूण, कुटलेले
१/२ टीस्पून आले, किसलेले
१ टीस्पून गरम मसाला
१/२ कप कांद्याची पेस्ट
१ कप टॉमेटो प्युरी
१/२ कप दही
चवीपुरते मीठ

कृती:
१) 'गट्टा' या लेबल खाली दिलेले सर्व जिन्नस एकत्र करून मळावे. लागल्यास थोडेसे पाणी किंवा दही घालावे. घट्टसर पीठ मळावे. ४ समान भागात विभागावे. हाताने दाबून लांबुडके रोल बनवावे.
२) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळवावे. त्यात गट्टा रोल्स घालावेत. काही मिनिटे उकळवून शिजवावे. गट्टे शिजले की पाण्यावर तरंगतात. थोडावेळ उकळून बाहेर काढावेत. थोडे गार झाले की १ इंचाच्या चकत्या करून घ्याव्यात.
३) करी बनवण्यासाठी कढईत तेल गरम करावे. त्यात जिरे, धने, हिंग, हळद, लाल तिखट, लसूण आणि आले घालावे. मध्यम आचेवर परतून कांद्याची पेस्ट आणि मीठ घालावे. कांद्याची पेस्ट लालसर होईस्तोवर परतावे.
४) आता टॉमेटोची प्युरी घालावी. आणि मध्यम आचेवर शिजू द्यावे. टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर शिजवावे.
५) आच मंद करून त्यात दही घालावे आणि ढवळावे. दही नीट मिक्स झाले की रश्शाचा दाटपणा सारखा करण्यासठी थोडे पाणी घालावे. थोडे मीठ, गरम मसाला आणि गट्टे घालावेत. झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे.
गरमच भात किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावेत.

Related

Rajasthani 4076893195856366327

Post a Comment Default Comments

  1. Kalach karun baghitali Gatta curry... khup chhan zali hoti... thanks Vaidehi...

    Regards...
    ragini

    ReplyDelete
  2. Nehami Pekshya kahi tari vegla..... nakki karaya pahije :)

    ReplyDelete
  3. hi vaidu sanjana hear
    me pan karun pahili gatta curry
    khup chaan jhali hoti thanks ...

    sandge chi recipe mail kar na

    ReplyDelete
  4. Hi, the blog / website is super-awesome :) absolutely loved it . however I could not find Dal-baati receipe . can you please post one. Also let me know how to cook baati at home in absence of a special baati cooker or an OTG . - Sneha

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item