ग्रीन चिली सॉस - Green Chili Sauce
Green Chili Sauce in English वेळ: ५ मिनिटे ३/४ कप सॉस साहित्य: १/४ कप लसूण पाकळ्या १/२ कप भरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे (मध्यम तिखट) १...
https://chakali.blogspot.com/2013/03/green-chili-sauce.html?m=1
वेळ: ५ मिनिटे
३/४ कप सॉस
साहित्य:
१/४ कप लसूण पाकळ्या
१/२ कप भरून हिरव्या मिरच्यांचे तुकडे (मध्यम तिखट)
१/४ कप व्हिनेगर
दीड टीस्पून मीठ
१/२ टीस्पून साखर
१/४ कप पाणी (किंवा गरजेनुसार)
कृती:
१) मिक्सरमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, मीठ, आणि साखर असे वाटून घ्यावे. बारीक वाटले की त्यात पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी.
२) चाळणीवर हे मिश्रण गाळून घ्यावे. डावेने घोटून जास्तीत जास्त सॉस गाळून घ्यावा. गाळलेल्या सॉसमध्ये व्हिनेगर घालून मिक्स करावे. लहान बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे.
टीप:
१) खूप तिखट मिरच्या वापरू नयेत. पोपटी रंगाच्या कमी तिखट आणि पातळ सालीच्या मिरच्या वापराव्यात.
२) मिरची लसणीची पेस्ट गाळल्यावर वरती उरलेला खर्डा बटाटा वडा बनवण्यासाठी वापरू शकता येईल.
३) व्हीनेगरचे प्रमाण सॉसची चव पाहून वाटल्यास वाढवावे.
Post a Comment