दही शेंगदाणा चटणी - Dahi Shengdana Chutney

Dahi Shengdana Chutney in English वेळ: ५ मिनिटे वाढणी: ३-४ जणांसाठी साहित्य: ३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ३ ते ४ टेस्पून दही ...


वेळ: ५ मिनिटे
वाढणी: ३-४ जणांसाठी

साहित्य:
३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
३ ते ४ टेस्पून दही
१ टीस्पून हिरव्या मिरच्यांची पेस्ट
१ टेस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
चवीपुरते मीठ
२ चिमटी साखर (ऐच्छिक)
चिमूटभर जिरेपूड (ऐच्छिक)

कृती:
दही घुसळून घ्या. त्यात मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर, जिरेपूड, आणि दाण्याचा कूट घालून मिक्स करावे. वाटल्यास मिक्सरमध्ये एक-दोनदा काही सेकंदच फिरवावे. आपल्याला बारीक पेस्ट व्हायला नकोय, थोडी भरडसरच असावी. पण थोडी मिळून येण्यासाठी मिक्सर वापरावा.
ही चटणी उपवासाच्या पदार्थांबरोबर (साबुदाणा थालीपीठ, साबुदाणे वडे, खिचडी) छान लागते. तसेच पोह्यांबरोबरही खायला चांगली वाटते.

टीपा:
१) दही किंचित आंबट हवे. नसल्यास काही थेंब लिंबाचा रस घालावा.
२) दही आणि शेंगदाणा कुटाचे प्रमाण कमी जास्त करू शकतो.

Related

Peanuts 6323456413016399386

Post a Comment Default Comments

  1. I think this chutney tastes good. I will try this. Thanks for sharing this recipe. For beverages check Drink Recipes

    ReplyDelete
  2. Hi!

    Tumhi var deleli dahi shengdanachi chatani Recipe lihun ghetali. Mrs la to kagad deto va shengdanachi chatani bawayala sangto.

    Satish

    ReplyDelete
  3. please send me some recipe for traveling, which use 2/3 days

    ReplyDelete
  4. Hi chutney apan laal tikhat ghalun keli tarihi mast lagte.

    ReplyDelete

item