केशर फिरणी - Firni

Firni in English वेळ: २० मिनिटे वाढणी: ५ जणांसाठी साहित्य: ६ टेस्पून बासमती तांदूळ ५ कप दुध १/२ कप साखर ३ चिमटी केशर ३ चिमटी वेलचीप...


वेळ: २० मिनिटे
वाढणी: ५ जणांसाठी

साहित्य:
६ टेस्पून बासमती तांदूळ
५ कप दुध
१/२ कप साखर
३ चिमटी केशर
३ चिमटी वेलचीपूड
८ बदाम
८ पिस्ते

कृती:
१) बासमती तांदूळ धुवून पुरेशा पाण्यात २-३ तास भिजवावेत. बदाम पिस्ते दुसऱ्या एका वाटीत भिजत घालावेत.
२) तांदूळातील पाणी काढून टाकावे. मिक्सरमध्ये बारीक वाटावे (मी थोडीशी रवाळ ठेवली होती). मिक्सरमध्ये वाटताना थोडेसे पाणी घालावे.
३) तांदळाची पेस्ट आणि दुध एकत्र करावे. जाड बुडाच्या पातेल्यात मिश्रण मध्यम आचेवर उकळवावे. तळापासून सारखे ढवळत राहा. कारण कच्च्या तांदुळाची पेस्ट तळाला चिकटते. साधारण ८-१० मिनिटे ढवळावे.
४) एकदा तांदूळ शिजला की शक्यतो तळाला चिकटत नाही. तांदूळ शिजला की साखर आणि केशर घालावे. मंद आचेवर ढवळत ५-८ मिनिटे फिरणी शिजू द्यावी.
५) फिरणी थोडी दाट झाली की आच बंद करावी आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. भिजवलेले बदाम पिस्ते सोलावेत आणि पातळ काप करावे.
६) फिरणी छोट्या मातीच्या भांड्यात घालावी. मातीची भांडी नसतील तर छोट्या बोलमध्ये वाढावी. वरून पिस्त-बदामचे काप आणि केशराच्या १-२ काड्या घालाव्यात.
फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवाव्यात.

टीपा:
१) शिजवताना जर फिरणी खूप घट्ट वाटली तर थोडे दुध घालून कंसीस्टन्सी सारखी करावी. अधिकचे दुध घातल्यावर उकळी काढावी.
२) फिरणी फ्रीजमध्ये ठेवल्यावर अजून थोडी घट्ट होते. त्यामुळे फिरणी खूप घट्ट नसावी.
३) फिरणी बनवताना भिजवलेले बदाम-पिस्त्याचे काप आत घालू शकतो.

Related

Sweet 1133985279384746932

Post a Comment Default Comments

  1. Hi Vaidehi,

    Thanks for Firani. Is this same as 'Payasam' or 'Tandulachi Khir'?

    Regards,
    Gauri.

    ReplyDelete
  2. Hi Gauri

    Thanks for the comment. Yes it is similar to payasam or tandulachi kheer.
    Tandulachi kheer shijavlelya bhatapasun banavtat. varti recipe thodi vegli ahe. Tandul bhijavun grind karun mag dudhat shijavle ahet.

    ReplyDelete
  3. Hi Vaidehi,
    Tandulach pith vaparal tar chalat ka?
    Let me know.
    Thanks,
    Sonal

    ReplyDelete
  4. तांदूळ बास्मति ऐवजी HMT Colum चालतील का?

    ReplyDelete
  5. पण माप काही नाही समजले , साखर आणि तांदूळ समान घ्याचे का ? आणि तांदुळास दुधाचे प्रमाण काय पाहिजे? .....THANKS DEVIKA

    ReplyDelete
    Replies
    1. sadharan 1/2 vati tandul ghyayche..ani 1/2 te paun vati sakhar... ani sadharan 1 te savva litre dudh ghyayche..
      sakhareche praman avadinusar kami jast karu shakto.. adhi kami ghatleli asli ki nantar vadhavta yete.

      Delete
  6. Hi ur blog is really very heplpful. Just wanted to ask can i add milkmaid in Phirni? Aani chalat asel tar kiti ghalu?

    ReplyDelete
    Replies
    1. Ho chalel.. andajanech ghalave lagel.. tandul shijle ki 2 te 3 chamche ghalun chav paha.. garaj vatli tar ajun ghalu shakto.

      Delete
  7. Hi vaidehi, tandulachi kheer chi recipe post kara plz. Shraaddh / paksh sathi recipe pahije

    ReplyDelete
    Replies
    1. barik tandul ghayche.. tyacha bhat shijvun ghyaycha.. dud ukalavun tyat bhat parat shijavaycha sakhar ani thodi vasala velchipud ghalaychi.

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item