आवळ्याचे सरबत - Avalyache sarbat

Amla Sharbat in English वेळ: १५ ते २० मिनिटे वाढणी: ८ ते १० जणांसाठी साहित्य: ७ ते ८ आवळे १ टीस्पून किसलेले आले साखर २ टीस्पून...

Amla Sharbat in English

वेळ: १५ ते २० मिनिटे
वाढणी: ८ ते १० जणांसाठीसाहित्य:
७ ते ८ आवळे
१ टीस्पून किसलेले आले
साखर
२ टीस्पून लिंबाचा रस

कृती:
१) आवळे कुकरमध्ये वाफवून घ्यावे. बिया काढून फक्त गर घ्यावा.
२) गराच्या दीडपट साखर घ्यावी. (गोड जास्त आवडत असल्यास साखर थोडी जास्त घेतली तरी चालेल)
३) साखर, आवळ्याचा गर, आले आणि लिंबाचा रस एकत्र करून घट्टसर पल्प बनवा.
हा पल्प प्लास्टिक किंवा काचेच्या बरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवावा.
सरबत बनवताना २ ते ३ टेस्पून पल्प घेउन त्यात २ चिमटी मीठ घालावे. आणि ग्लासभर पाणी घालावे.

टीपा:
१) आवळ्याचे बारीक कण नको असल्यास पल्प चाळणीत गाळून घेतला तरी चालेल.
२) पल्प कोरड्या बरणीत भरावा. तसेच पल्प काढण्यासाठी चमचा वापराल तोही कोरडा असावा.
३) हा पल्प फ्रीजरमध्येही स्टोअर करता येतो. बर्फाच्या ट्रेमध्ये पल्प भरून फ्रीझ करावे. पल्प गोठला कि ट्रेमधून काढून हे क्युब्ज प्लास्टिक झिपलॉक पिशवीत ठेवावे. आणि परत फ्रीजरमध्ये ठेवावे. जेव्हा लागेल तेव्हा एक-दोन क्यूब्ज वापरून सरबत बनवता येईल. (जर वीजकपातीचा प्रॉब्लेम असेल तर ही पद्धत अवलंबू नकात. फ्रीजमध्येच बरणीत भरून ठेवा. कारण पल्प गोठून वितळला आणि परत गोठला कि त्याची चव उतरते.)
४) आवडत असल्यास सरबतात थोडेसे काळे मीठ घालावे. छान स्वाद येतो.

Nutritional Info: Per Serving
Calories:- 111 | Carbs:- 29 g | Fat:- 0 | Protein:- 0 | Sat. Fat:- 0 | Sugar:- 29 g

Related

Marathi 6905970656211583625

Post a Comment Default Comments

 1. hi vaidehi , he sarbat fridge madhe n thevta kiti divas tikte?

  ReplyDelete
 2. Hello

  He sarbat fridge baher far tikayche nahi.

  ReplyDelete
 3. hello vaidehi, jilebi chi recipe post kar na !!!

  ReplyDelete
 4. आवळा म्हणजे सी विटेमीन चा सर्वात उत्कृष्ट स्त्रोत
  त्याचे सरबत सोबतीला आले
  म्हणजे भारी जाहले.

  ReplyDelete
 5. कमेंटसाठी धन्यवाद निनाद.

  ReplyDelete
 6. Hi Vaidehi, Jar Awle na shijavta kachchya awalyacha ras gheeun (pani na ghalta), ani duppat sakharecha golibanda pak karu mix kele tar sarbat fridge baher pan tikte........

  ReplyDelete
 7. Hi................... Vaidehi tai, Sarbatachi recipe khup chhan Ahe. Thank you........... Mala Goad Awla Manje Awla petha banvaychay. Gelya varsi banvala hota pan to tikla nai. fridgemade navta tevla tyamule vas yet hota. Mla tyachi recipe ani to varshbhar kivya khup divas kasa tikavun tevta yeil te sangsil ka? maza e-mail id ahe dingankarrekha6@gmail.com. Thank you in Advance......

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item