मिंट पनीर पहाडी - Mint Paneer Pahadi
Paneer Pahadi in English वेळ: २० ते २५ मिनिटे (मॅरीनेशनचा वेळ वगळून) वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: २०० ग्राम पनीर, मोठे चौकोनी तु...
https://chakali.blogspot.com/2012/11/mint-paneer-pahadi.html?m=1
वेळ: २० ते २५ मिनिटे (मॅरीनेशनचा वेळ वगळून)
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२०० ग्राम पनीर, मोठे चौकोनी तुकडे
१ मध्यम भोपळी मिरची, मध्यम चौकोनी तुकडे
१ लहान कांदा, मध्यम चौकोनी तुकडे (प्रत्येक पाकळी विलग करावी.)
::::पुदिना चटणी::::
१/४ कप पुदिन्याची पाने
२ टेस्पून कोथिंबीर
१ टीस्पून कॉर्न फ्लोअर
५ हिरव्या मिरच्या
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून जिरेपूड
४ ते ५ लसूण पाकळ्या
२ टेस्पून आंबट दही
चवीपुरते मीठ
इतर साहित्य:
२ टीस्पून तेल
थोडेसे मीठ, पनीर ग्रील केल्यावर भुरभुरायला.
१ टीस्पून चाट मसाला + १/२ टीस्पून तंदूर मसाला
२ ते ३ चिमटी मिरपूड
२ ते ३ चिमटी लाल तिखट पावडर
कृती:
१) पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, धने-जिरेपूड, लसूण, दही आणि मीठ एकत्र करावे. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. घट्टसर पेस्ट बनवावी. त्यात कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करावे.
२) पनीर, भोपळी मिरची, आणि कांदा एकत्र करून पुदिन्याच्या पेस्टमध्ये मॅरीनेट करावे. जर मेटल स्क्युअर्स असतील तर त्यावर भाज्या आणि पनीर ओवून घ्यावे. १ तास फ्रीजमध्ये ठेवावे.
३) तंदूर ३-४ मिनिटे प्रीहीट करावा. पनीर आणि भाज्यांवर तेल स्प्रे करून घ्यावे. नंतर स्क्युअर्स तंदूरमध्ये ठेवून कडा ब्राउन होईस्तोवर ग्रील करावे.
बाहेर काढून थोडे पातळ केलेले बटर ब्रश करावे. त्यावर चाट मसाला, तंदूर मसाला, मिरपूड, लाल तिखट आणि थोडे मीठ घालून सर्व्ह करावे
हे अपेटायझर नुसतेच छान लागते. वाटलेच तर बरोबर पातळ उभा चिरलेला कांदा, त्यावर लिंबू पिळून आणि थोडे मीठ घालून सर्व्ह करावे.
टिपा:
१) पनीर मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये "ग्रील" या ऑप्शनवर किंवा ओटीजीमध्ये ग्रील करू शकतो. जर यापैकी काही साधने नसतील तर सोपा मार्ग म्हणजे स्क्युअर्स थेट गॅसच्या आचेवर धरावे. आच मध्यम ठेवावी. काही इंच वर स्क्युअर धरून पनीर भाजावे.
२) हे कबाब पार्टीसाठी योग्य स्टार्टर आहे. कारण स्क्युअर्सवर ओवून कबाब तयार ठेवता येतील. गेस्ट्स आले कि फक्त पनीर ग्रील करून सर्व्ह करावे.
३) जर वूडन स्क्युअर्स असतील तर अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवाव्यात म्हणजे तंदूरमध्ये त्या जळणार नाहीत.
really awesome recipe. Tried it and it is very tasty..
ReplyDeleteThanks
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeleteHope you are doing well...
First let me tell you thanks for sharing so much recipe with us with your lots of experience & specially with images...bcoz just by seeing the pics i feel really hungry & then after reading your recipe i cant control myself by trying this at my home....
my parents really loved the food which i made at my home that also just bcoz of you....bcoz most of the times i tried your recipe only including Maharashtrian, South Indian , North India veg & non veg...all are really awesome...
Once again thanks a lot...
keep posting.
Thanks & Best Regards,
Rupali Nikam.
Thank you Rupali
Delete