इडली फ्राय - Idli Fry using leftover idlis

Idli Fry in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: दोन जणांसाठी साहित्य: १० मध्यम इडल्या (शक्यतो आदल्या दिवशीच्या उरलेल्या) १ टेस्पून तेल ...

Idli Fry in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: दोन जणांसाठी
साहित्य:
१० मध्यम इडल्या (शक्यतो आदल्या दिवशीच्या उरलेल्या)
१ टेस्पून तेल
१/२ टीस्पून उडीद डाळ, २ चिमटी हिंग
३ लाल सुक्या मिरच्या
४ ते ५ कढीपत्ता पाने
किंचित मीठ (इडलीमध्ये ऑलरेडी मीठ आहे)

कृती:
१) इडल्यांचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. मिरच्या दोन-दोन तुकडे करावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात आधी उडीद डाळ घालावी. रंग गुलाबीसर झाला कि त्यात हिंग, मिरच्या आणि कढीपत्ता घालावा.
३) आता इडलीचे तुकडे घालून मिक्स करावे. थोडे मीठ लागल्यास घालावे. इडल्या थोड्या लालसर होईस्तोवर परतावे.
कोथिंबीर घालून ब्रेकफास्ट म्हणून सर्व्ह करावे.

टीप:
१) इडलीचा आकार जर थोडा मोठा असेल तर तेलाचे प्रमाण थोडे वाढवावे लागेल.

Related

South Indian 4992313801896147549

Post a Comment Default Comments

  1. Hi Vaidehi. Thanks for such a nice blog..
    You try this idli fry with chienese touch.. it teasts good.

    ReplyDelete
  2. ya idlit mi tuzi pudi chatany try keli ----mast :) with coffee **

    ReplyDelete

item