बिटाची भाजी - Beetachi Bhaji

Beetroot Dry sabzi in English  वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: २ मध्यम बीट, उकडलेले १ टेस्पून तेल, १/४ टीस्पून जिर...

Beetroot Dry sabzi in English

 वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी


साहित्य:
२ मध्यम बीट, उकडलेले
१ टेस्पून तेल, १/४ टीस्पून जिरे, १/८ टीस्पून हिंग, १/८ टीस्पून हळद
१ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
२ ते ३ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
२ टेस्पून शेंगदाण्याचा कूट, भरडसर
चवीपुरते मीठ
१ टीस्पून साखर
१ टीस्पून लिंबाचा रस

कृती:
१) उकडलेले बीट सोलून घ्यावे. बारीक चिरून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, हळद, आणि हिरवी मिरची पेस्ट घालावी. त्यात चिरलेले बीट आणि  मीठ घालावे.
३) नारळ घालून झाकण ठेवावे. मंद आचेवर ५ मिनिटे वाफ काढावी. नंतर शेंगदाणा कूट आणि चवीपुरती साखर घालून २ मिनिटे ढवळावे.
४) लिंबाचा रस घालून मिक्स करावे. गरम वाढावी.

Related

Marathi 2410150725222093506

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item