खव्याचे मोदक - khavyache modak

Khoya modak in English वेळ: २५ मिनिटे साधारण १५  लहान मोदक साहित्य: १/२ कप खवा ( रिकोटा चीजपासून खवा कसा करावा. ) १/२ कप साखर (महत्...

Khoya modak in English

वेळ: २५ मिनिटे
साधारण १५  लहान मोदक

साहित्य:
१/२ कप खवा (रिकोटा चीजपासून खवा कसा करावा.)
१/२ कप साखर (महत्त्वाची टीप)
२ ते ३ टेस्पून मिल्क पावडर
२ चिमटी वेलची पूड

कृती:
१) साखर मिक्सरमध्ये बारीक करून पिठी साखर बनवा.
२) खवा मायक्रोवेव्हसेफ भांड्यात ठेवून १ मिनिट हाय पॉवरवर गरम करा. भांडे बाहेर काढून ४० ते ४५ सेकंद ढवळा. यामुळे आत कोंडली गेलेली वाफ बाहेर पडेल. परत ४५ ते ५० सेकंद मायक्रोवेव्ह करा.
३) भांडे बाहेर काढून ढवळा. खवा कोमटसर झाला कि पिठीसाखर आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे. मिश्रण व्यवस्थित आळले तर मोदकाच्या साच्यात भरून मोदक बनवावेत.
४) मिश्रणाला जर मोदक होण्याइतपत घट्टपणा आला नसेल तर मिल्क पावडर घालावी. हाताने मळून घ्यावे. [खूप जास्त मळू नये, फक्त नीट मिक्स होईस्तोवर मळावे. नाहीतर गोळा तुपकट आणि चिकट होईल].
५) मिश्रण अगदी किंचित कोमट असेल तेव्हा मोदक बनवावेत.

टिप्स:
१) खव्याचे मिश्रण घट्ट झाले नसेल तर थोडी मिल्क पावडर घालावी.
२) साखर घातल्यावर मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करू नये.
३) पिवळे मोदक हवे असल्यास खायचा पिवळा रंग चिमूटभर घालावा. मी ४ ते ५ थेंब लिक्विड कलर वापरला होता.
४) साखर मिक्सरमध्ये बारीक केल्यावर बारीक चाळणीमधून चाळून घ्यावी. चाळणीत राहिलेली साखर परत बारीक करावी. जर पिठी साखर न चाळता घेतली तर साखरेचे बारीक बारीक कण मोदक खाताना दाताखाली येतात.
५) हे मोदक मायक्रोवेव्हमध्ये करायला सोप्पे आहेत. पण गॅसवर सुद्धा हे मोदक करता येतील. पॅनमध्ये खवा मोकळा करून मध्यम आचेवर भाजावा. त्यातील तूप बाहेर येईपर्यंत भाजला गेला पाहिजे. भाजलेला खवा दुसऱ्या भांड्यात काढून ठेवावा. कोमटसर झाला कि चाळलेली पिठीसाखर यात घालावी, वेलचीपूड घालावी आणि मळावे. मिश्रण चिकट झाले तर दोन-तीन चमचे मिल्क पावडर घालावी. मोदकाच्या साच्यात घालून मोदक करावेत.
६) अमेरिकेत खवा बहुतांश इंडियन ग्रोसरी स्टोअर्समध्ये मिळू शकतो. (फ्रोझन सेक्शनमध्ये शोधा)

Related

बदाम कुल्फी - Badam Kulfi

Badam Mava Kulfi (English Version) वाढणी: २-३ जणांसाठी साहित्य: ३ कप दुध (होल मिल्क) १/४ कप ताजा मावा (साधारण ४ टेस्पून) १/२ ते पाउण कप साखर १/३ कप बदामाचे काप २ टिस्पून कॉर्न फ्लोअर १/२ टिस्पून व...

Badam Malai Kulfi

Almond Kulfi in MarathiServes – 2 to 3Ingredients:3 cups whole Milk¼ cup Fresh Mawa (2 Tbsp)½ to ¾ cup Sugar1/3 cup Almond pieces2 tsp Corn Flour½ tsp Cardamom powderPinch of SaffronMethod:1) Grind Al...

रताळे पोळी - Ratale Poli

Sweet Potato Roti (English Version) साहित्य: २ कप रताळ्याच्या फोडी १ कप किसलेला गूळ कणिक २ टेस्पून तेल तूप कृती: १) फोडी कूकरमध्ये वाफवून घ्याव्यात. फोडी कूकरच्या डब्यात ठेवाव्यात, डब्यात पाणी घाल...

Newer Post Mango Modak
Older Post Khawa Modak

Post a Comment Default Comments

  1. ganapati bappa moryaa
    khupch chhan recipe ahe ani agadi yogya veli post keli ahe :)
    yaveli m prasad gharich karel
    shweta

    ReplyDelete
  2. Ganpati la nakkich karun pahanyajogey. Modak khupach Subak jhale aahet.

    ReplyDelete
  3. Mala modak banavnya sathi chotya size cha mould kuthe milel. Aani ready khava use karayacha asel tar konta brand cha vaparayacha.

    ReplyDelete
  4. Vaidehi,

    Me khava aata banavla anhi Ganesh chaturthi partyant ziplock bag madhye freeze kela tar chalel ka? Maala thoda aata vapraycha ahe eka recipe madhye.

    Priti

    ReplyDelete
  5. Will definitely try in this Ganapati .. Thanks for posting the recipe:)

    - Vedika

    ReplyDelete
  6. Thanks Vedika,
    When you try it, do let me know how they turned out. !!

    ReplyDelete
  7. Hi Priti,

    Khava kashacha banavla? Ricotta cheese cha ka? Freezer madhye 8 divas tari rahil. tyapudhe kitpat tikel yabaddal me sure nahiye. Karan khava dairy product ahe. khup shila karun suddha chav utarte.

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item