दुधी भोपळ्याचे थालीपीठ - Dudhi Thalipeeth
Lauki Thalipeeth in English वेळ: ३० मिनिटे वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे साहित्य: १ कप सोलून किसलेला दुधी भोपळा दीड ते दोन कप उपवासाची...
https://chakali.blogspot.com/2011/07/dudhi-thalipeeth.html?m=1
Lauki Thalipeeth in English
वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ ते ४ मध्यम थालीपीठे
साहित्य:
१ कप सोलून किसलेला दुधी भोपळा
दीड ते दोन कप उपवासाची भाजणी किंवा गरजेनुसार
३ हिरव्या मिरच्या, ठेचून
१/४ चूप बारीक चिरलेली कोथिंबीर
१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
चवीनुसार मीठ
तूप किंवा शेंगदाण्याचे तेल थालीपीठ भाजताना
कृती:
१) किसलेल्या दुधीमध्ये हिरवी मिरची, मीठ, शेंगदाण्याचा कूट, आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. गरजेनुसार भाजणी घालून कणकेला भिजवतो तेवढे घट्ट भिजवून घ्यावे. भिजवलेल्या पिठाचे टेनिसच्या बॉलएवढे गोळे करून घ्यावे.
२) नॉनस्टिक तव्याला तूप लावून घ्यावे. हाताला चिकटू नये म्हणून हातालाही थोडेसे तूप लावावे. हाताने एकसारखे थालीपिठ थापावे. मध्याभागी तेल सोडायला बोटाने छिद्रं करावे.
३) मिडीयम आणि हायच्या मध्ये गॅस अडजस्ट करावा. झाकण ठेवून थालीपीठ शिजू द्यावे. मिनिटभराने झाकण काढून कडेने तूप सोडावे. झाकून एक बाजू नीट शिजू द्यावी. कालथ्याने उलथून, झाकण ठेवून दुसरी बाजूही शिजवावी.
गरमगरम थालीपीठ वाढताना दही आणि लिंबाचे गोड लोणचे बरोबर खायला द्यावे.
टीप:
१) दुधी बिनबियांचा आणि कोवळा असावा, म्हणजे किसायला सोपा जातो.
२) थालीपिठ शिजायला वेळ लागतो. जास्त थालीपीठं बनवताना वेळ वाचवण्यासाठी दोन शेगड्यावर दोन तवे वापरून थालीपीठं बनवावी.
३) काहीजण दुधी भोपळा उपवासाला खात नाहीत. म्हणून दुधीऐवजी काकडी किसून घालावी.

upvasachi bhjani means wat.
ReplyDeleteSahi Vaidehi!
ReplyDeleteekdam potbharnyasaarkhi, chamchamit ani sopi recipe paathvlis
Navraatrit nakki try karen.
Amhi Dudiche vade banvto . upvasachya bhajn eivani, thoda tandul peetha ni jas gavhacha peeth vaprto ani chote chote vase thapun te deep fry karto. it's so crispy and tasty .
thank you very much this recipe.
nakki try karen
thanks Sheetal
ReplyDeleteUpasachi bhajani mhanje sabudana, vari, rajgira ani jira he sarv bhajun tyache mixed pith..
ReplyDeletetyache praman lavkarach post karen.
this recipe is fantanstic i like it very much thanks
ReplyDeletedhanyavad gauri
ReplyDeletebhajni recipee plz send kar na.
ReplyDeleteHello Vedika
ReplyDeleteUpasachi bhajani recipe sathi ithe click kar
thanks vaidehi..
ReplyDeletechhan zalet
Hi Vaidehi,
DeleteI am a regular visitor of ur Website.Updation of your site is very Nice .I always try your recepies.Keep it up to post new recepies.
धन्यवाद सीमा..
Deleteमी दुधी च्या ऐवजी उकडलेले रताळे घालून असेच थालीपीठ केले होते :)
ReplyDeleteHello Devika
Deleteyaat nuste kisalele kacche ratale thoda bhijavlela sabudana ghatla tari chhan lagel.
hello mam,
Deleteupwasachya bhajni aiwaji kay use karta yeil??
plz reply
amisha
shingadyache kiva rajgiryache pith vaparu shakto
DeleteDudhi bhoplya च्या थालीपीठ मधे उपवास च्या भाजणी ऐवजी गव्हाचे पिठ वापरले तर चालेल का ?
ReplyDeleteho chalel.. mix pith vaparun suddha karu shakto..
Delete