कैरीचे रायते - Kairiche Raite

Kairi Raita in English वेळ: १० मिनीटे साधारण १ कप साहित्य: १ कप कैरीचा गर (कृती - स्टेप १) १/२ कप गूळ १/२ टिस्पून लाल तिखट चवीपुरते...

Kairi Raita in English

वेळ: १० मिनीटे
साधारण १ कप

साहित्य:
१ कप कैरीचा गर (कृती - स्टेप १)
१/२ कप गूळ
१/२ टिस्पून लाल तिखट
चवीपुरते मिठ
१ टिस्पून तेल
२ कढीपत्त पाने
१/४ टिस्पून जिरे
चिमूटभर हिंग
१ लाल मिरची

कृती:
१) कूकरमध्ये १ कप पाणी घालावे. कूकरच्या डब्यात पाणी न घालता आख्खी कैरी ठेवावी. २ ते ३ शिट्ट्या करून कैरी वाफवून घ्यावी. कूकरची वाफ जिरली कि लगेच कैरी बाहेर काढून गरम असतानाच त्यातील गर काढून घ्यावा.
२) या गरामध्ये गूळ कुस्करून घालावा.
३) या मिश्रणात लाल तिखट आणि चवीपुरते मिठ घालावे. तेल, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची घालून फोडणी करावी. हि फोडणी कैरीच्या गरावर घालावी.
सर्व निट मिक्स करून जेवणात तोंडीलावणी घ्यावे.

टीप:
१) आवडीनुसार गुळाचे प्रमाण कमीजास्त करावे.

Related

Raita 13638590709447134

Post a Comment Default Comments

  1. Yummy. I love anything made with kairi. Will make this the next time I get some kairi!

    ReplyDelete
  2. CLASSIC. NUSTE VACHUNHI TONDALA PANI SUTLE AAHE. TABADTOB KARNE ALECH.

    ReplyDelete
  3. Vaidehi

    sahi re ...khup sopi recipe angitalis

    he rayate na methchya theplya sobat pan chaan lagate . mazi ek gujju maitrin aanate

    thank you very much

    Ye pan tu mala veg. kolhapurichi recipe kadhi denar. lavkar de na

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item