लिंबाचे टिकाऊ सरबत - Limbu sarbat
Lemon Juice in English वेळ: साधारण २५ मिनीटे साधारण ३ कप लिंबाचे टिकाऊ सरबत (यातून साधारण २०-२२ जणांना लिंबाचे सरबत बनू शकेल)
https://chakali.blogspot.com/2010/11/limbu-sarbat.html?m=1
Lemon Juice in English
वेळ: साधारण २५ मिनीटे
साधारण ३ कप लिंबाचे टिकाऊ सरबत (यातून साधारण २०-२२ जणांना लिंबाचे सरबत बनू शकेल)
साहित्य:
१ कप लिंबाचा रस (साधारण १२ मोठी रसाची लिंबं)
अडीच कप साखर
३/४ कप पाणी
२ टिस्पून मिठ
कृती:
१) लिंबाचा रस गाळून घ्यावा म्हणजे बिया आणि लिंबाचा किंचीत राहिलेला गर निघून फक्त लिंबाचा रस उरेल.
२) अडीच कप साखर आणि ३/४ कप पाणी एका पातेल्यात एकत्र करावे. गोळीबंद पाक करावा (महत्त्वाची टिप).
३) पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. तयार पाकात लिंबाचा रस घालून ५ मिनीटे ढवळावे. नंतर जरा निवेस्तोवर अधूनमधून ढवळावे.
४) तयार लिंबू सरबत काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवावा.
लिंबाचे सरबत करताना १ ग्लासभर लिंबाचे सरबत बनवायचे असल्यास, एका ग्लासमध्ये २ मोठे चमचे लिंबाचा पाक घालावा, गार पाणी घालावे आणि मिक्स करावे. मिठाची गरज लागल्यास किंचीत मिठ घालावे. तसेच बर्फही घालू शकतो.
टीप:
१) लिंबाच्या सरबतात चिमूटभर वेलचीपूड घातली तरी छान फ्लेवर येतो.
२) गोळीबंद पाक म्हणजे पाकाचा थेंब गार पाण्यात टाकल्यावर टणक गोळी तयार झाला पाहिजे. पण लिंबू सरबताला मऊसर गोळी (Soft Ball Consistency) तयार झाली तरीही चालेल.
Labels:
Lemon Juice, Homemade Lemonade, limbu sarbat

वा! छान रेसिपी सांगितलीत.
ReplyDeletemajhi aai he sarbat karaychi
ReplyDeletejust she used to add saindhav meeth or kala namak in to it
हे कॉन्सन्ट्रेट सरबत फ्रिजमधे किती दिवस टिकू शकेल?
ReplyDeleteधन्यवाद कांचनताई, गायत्री
ReplyDeleteगायत्री: चांगली आयडीया आहे..
कांचन ताई: हे सरबत concentrate फ्रिजमध्ये ३-४ महिने सहज टिकते.
३ ते ४ महिने टिकतं! मग तर बरंच झालं. ऐनवेळेस सर्व्ह करण्यासाठी चांगलं घरगुती सरबत मिळालं. या माहितीसाठी खूप आभार वैदेही.
ReplyDeletedhanyavad
ReplyDeleteवैदेही,
ReplyDeleteलिंबू सरबत बनवले. छानच झाले आहे. या रेसिपीसाठी पुन्हा एकदा आभार.
अशाच प्रकारे कोकम सरबत कॉन्सन्ट्रेटची रेसिपी देऊ शकाल का?
नमस्कार कांचन,
ReplyDeleteलिंबू सरबत बनवलेत आणि आठवणीने कमेंट पोस्ट केलीत त्याबद्दल धन्यवाद
कोकमाचे सरबत जनरली रातांब्याच्या (कोकम फळ) आतील गरापासून बनवतात, पण जर शक्य असेल तर मी सुकवलेल्या कोकमापासून बनवून पाहिन, पाककृती निट जमली तर नक्की पोस्ट करेन.
chhan! gharat nemaki khoop limb ali ani hi recipe milali. thanks alot
ReplyDeletethanks suvarna
ReplyDeleteवैदेही, रातांब्यांचे कोकम सरबत जरा वेळखाऊ काम आहे ;-) म्हणजे, साखर आणि गराचे लेयर्स दादरा बांधून ठेवायचे इ. तसं हल्लीच्या घरांमधे जागेच्या अपुरेपणामुळे करता येत नाही. शिवाय शुचिताही बाळगावी लागते. जर सुक्या कोकमांच्या सिरपची पाकृ देता आली तर खूप बरं होईल. धन्यवाद.
ReplyDeleteसजेशन्समधे एक कमेंट लिहिते आहे.
कांचन
ReplyDeleteबरोबर आहे आणि इथे अमेरीकेत कुठे मिळायचे रातांबे :) मी ट्राय करून पाहिन सुक्या कोकमापासून, चांगली कल्पना आहे.
Nice Recipe ,,,Thanks
ReplyDeletedhanyavad deepak
ReplyDeleteछान आहे रेसीपी...ह्या सरबतासारखे संत्र्याचे पण सरबत करता येइल का?
ReplyDeleteनमस्कार मिनाक्षी
ReplyDeleteसंत्र्याचे सरबत नक्की पोस्ट करेन.
धन्यवाद
ReplyDeleteबाजारात महागडी सिरप घेण्यापेक्षा हे खूप चांगल आहे.
Aparna, Pune.
heloo अपर्णा
ReplyDeleteनक्कीच, आणि चवीलाही खुप छान लागते.
hello vaidehi , khup chagale recipes aahet .
ReplyDeletethanks!!! nice recepie
ReplyDeletealka
khup chaan thank you
ReplyDeletethanks
ReplyDeletekiti simple :)wow..Summer season saathi tar Best !! :) aaj lagech try karnaar aahe mi...
ReplyDeleteya sarbat madhe jar - 1 Question:
Aawala, Ginger he add karayach asel tar ????
Please recipe asel tar post karavi :):) Dhanyawad taai....
ho chalel.. avalyacha ras ani alyacha ras ase thoda thoda add kar limbu rasabarobar.
ReplyDeletemazi aai limbu rasat sakhar mix karun te unhat thewat ase...
ReplyDeletesarabat tikanyasthi changla upay ahe.
ReplyDeleteमस्तच रेसिपी आहे.
ReplyDeleteह्या बाटलीबंद सरबतात सोडा घालून फ्रेश लैइम सोडा मस्त लागतो.
आम्ही हॉटेलात साखरेचा गोळीबंद पाक व ताजा लिंबाचा रस टाकून बनवायचो.
पण ही कल्पना अफलातून आहे. म्हणजे पाकात लिंबाचा रस
Hi Ninad,
ReplyDeletethanks for comment. he sarbat khup chan lagate. ani fresh lime soda mastach.
वैदेही ताई धन्यवाद माझ्या छोट्याश्या धंद्यासाठी आपली ही रेसेपी महत्वपुर्ण ठरतीये
ReplyDeleteKalavlyabaddal dhanyavad Ajit.
DeleteThanks Vaidehi. Mast zale maze limbu sarbat. Sagalyana khup avadale.
ReplyDeleteWithout fridge kiti divas tikate
ReplyDelete