साबुदाणा कसा भिजवावा?

How to Soak Sabudana in English साबुदाणा कसा भिजवावा? साबुदाणा भिजवताना प्रथम साबुदाणे एका स्टीलच्या पातेल्यात किंवा काचेच्या मध्यम बोलम...

How to Soak Sabudana in English

साबुदाणा कसा भिजवावा?

how to soak sabudana, sabudana kasa bhijavavaसाबुदाणा भिजवताना प्रथम साबुदाणे एका स्टीलच्या पातेल्यात किंवा काचेच्या मध्यम बोलमध्ये घ्यावे. अगदी किंचीत कोमट पाणी घेऊन हलक्या हाताने १० ते १५ सेकंदच धुवावे. धुतलेल्या साबुदाण्यातील पाणी काढून टाकावे आणि साबुदाण्याच्या पातळीवर १/२ सेंमी राहील इतकेच पाणी घ्यावे. झाकण ठेवून साधारण ४ तास भिजू द्यावे. भिजल्यावर साबुदाण्याचे दाणे पुर्ण भिजले गेले पाहिजेत तसेच प्रत्येक दाणा मोकळा राहिला पाहिजे.

साबुदाणा खिचडीच्या रेसिपीसाठी इथे क्लिक करा
तसेच इतर साबुदाण्याचे पदार्थ

टीप:
१) साबुदाणा गरम पाण्यात भिजवू नये. यामुळे साबुदाणा चिकट होतो.
२) बर्‍याचदा साबुदाण्याच्या क्वालिटीवर साबुदाणा भिजवणे अवलंबून असते. कधी-कधी साबुदाणा पिठूळ असतो आणि पाणी जास्त शोषत नाही. अशावेळी साबुदाणा धुवून घ्यावा आणि त्यातील पाणी काढून टाकावे. अधिकचे पाणी घालू नये. झाकण ठेवून ३ तास साबुदाणा भिजू द्यावा.
३) साबुदाणा भिजवल्यावर नेहमी झाकून ठेवावा, नाहीतर पाणी शोषले गेल्यावर साबुदाण्याचा वरचा थर कोरडा पडतो.

Related

Techniques 529157681601897153

Post a Comment Default Comments

  1. मस्त टीप! मी साबुदाणा भिजवताना ज्या कपाने अथवा भांड्यातून साबुदाणा मापून घेतला असेल, तितकं मापून व किंचीत अधिक असं पाणी भिजवण्यासाठी घेते. तुमची ही टीप सुद्धा फॉलो करून पाहीन.

    ReplyDelete
  2. साबुदाणा एक डब्यात भिजवावा -अर्धा सेमी वर पाणी ठेऊन . आणि तो डबा अर्ध्या तासाने उलटा करा म्हणजे वर पासून सगळा साबुदाणा सारखा भिजेल

    ReplyDelete

item