डाळींबी आमटी - Dalimbi Amti

Dalimbi Amti in English २ ते ३ जणांसाठी वेळ: १५ मिनीटे साहित्य: १ कप मोड आलेले आणि सोललेले वाल १ टेस्पून तेल १/४ कप सुके खोबरे, किसू...

Dalimbi Amti in English

२ ते ३ जणांसाठी
वेळ: १५ मिनीटे

dalimbi amti, dalimbyanchi amati, maharashtrian amti recipe, valachi amtiसाहित्य:
१ कप मोड आलेले आणि सोललेले वाल
१ टेस्पून तेल
१/४ कप सुके खोबरे, किसून
१/२ टिस्पून जिरे, भाजण्यासाठी
१/२ टिस्पून जिरे, फोडणीसाठी
१/८ टिस्पून हिंग
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून तिखट
३-४ कढीपत्ता पाने
२ टिस्पून कोथिंबीर
२ आमसुलं
१ टिस्पून गूळ किंवा १ टिस्पून साखर
चवीपुरते मिठ

कृती:
१) किसलेले सुके खोबरे खरपूस भाजून घ्यावे. जिरे खमंग भाजावे. भाजलेले खोबरे हातानेच चुरून घ्यावे. भाजलेले जिरे खलबत्त्यात कुटून घ्यावे.
२) डाळींब्या मिठ घालून अगदी किंचीत वाफवून घ्याव्यात. पुर्ण लगदा होवू देवू नये. वाफवलेल्या डाळींब्यातील थोड्या डाळींब्या चेचून घ्याव्यात.
३) पातेल्यात तेल गरम करावे. जिरे, हिंग, हळद, तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात डाळींब्या घालाव्यात. कपभर पाणी घालावेत. आमसुलं घालावीत. कुटलेले जिरे आणि भाजलेले खोबरे घालावे. मध्यम आचेवर २ मिनीटे उकळी काढावी. पातळपणासाठी गरजेनुसार पाणी घालावे. नंतर गूळ घालून १-२ मिनीटे उकळी काढावी. गरज वाटल्यास मिठ घालावे. एकदम मंद आच ठेवून थोडावेळ झाकण ठेवून आमटी मुरू द्यावी. कोथिंबीर घालून सजवावे.
गरमागरम तूपभाताबरोबर हि आमटी मस्त लागते.

टीप:
१) मी शिजवलेल्या डाळींब्या ५०% चेचून घेते आणि थोडया आख्ख्या ठेवते म्हणजे आमटी छान मिळून येते. फक्त फोटोत डाळींब्या दिसाव्यात म्हणून आख्ख्या ठेवल्या आहेत.

Labels:
Dalimbyanchi Amti, Dalimbi Amti

Related

Marathi 8407664915311228250

Post a Comment Default Comments

  1. Wowww... Koknatlya Walachya Biradyachi aathwan zali... masta photo ahe! :) Ani recipesuddha

    Swati

    ReplyDelete
  2. तुम्ही दिलेले फोटो असे मस्त असतात ना की जठराग्नी प्रदिप्त झालाच पाहिजे. आज मुगाचं बिरडं करायचा बेत आहे. तुमची रेसिपी मुगावर ट्राय करून पाहिन. वालाची उसळ, बिरडं, खिचडी याची जबरदस्त पंखी आहे. आमटी मिळून येण्यासाठी तुम्ही दिलेली टीप आवडली.

    ReplyDelete
  3. धन्यवाद कांचन.. :)

    ReplyDelete
  4. hi vaidehi,
    mast aahe hi aamati,pan hyamadhye fakt jeere khobare ghaltat ki ajun kala masala ghatala tari chalel ka?

    ReplyDelete
  5. thanks Janhavi,
    kala masala ghatla tari chalto.. chan lagte..

    ReplyDelete
  6. can u post a aambat varan recipe?

    ReplyDelete
  7. Hi tanu

    nakki post karen ambat varan recipe

    ReplyDelete

item