कॉर्न आणि मेथी पुलाव

Corn and Methi Pulao in English कॉर्न आणि मेथी पुलाव वाढणी : २ जणांसाठी साहित्य: ३/४ कप बासमती तांदूळ ३/४ कप मेथीची पाने ३/४ कप क...

Corn and Methi Pulao in English

कॉर्न आणि मेथी पुलाव

वाढणी : २ जणांसाठी

corn pulao, corn pulav, vegetable pulav, pilaf, how to make indian pulao rice

साहित्य:
३/४ कप बासमती तांदूळ
३/४ कप मेथीची पाने
३/४ कप कांदा, पातळ उभा चिरून
२ हिरव्या मिरच्या, उभ्या चिरून
१/२ कप मक्याचे दाणे, उकडून
१ टिस्पून किसलेले आले
३ टेस्पून तेल
३/४ कप दही
२ तमाल पत्र
४ लवंगा
२ वेलची
दिड कप पाणी
चवीपुरते मिठ
१ टेस्पून तूप
चिमूटभर कसूरी मेथी, पूड करून घ्यावी
थोडी कोथिंबीर, सजावटीसाठी

कृती:
१) मेथी साफ करण्यासाठी, बारीक चिरून १/२ तास मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवावी. बासमती तांदूळ धुवून, पाण्यात २० मिनीटे भिजवून ठेवावा.
२) धुतलेली मेथी पाण्यातून काढून पिळून घ्यावी म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी होईल. भिजवलेले तांदूळही निथळून १० मिनीटे ठेवावे.
३) एका खोलगट पातेल्यात तेल गरम करावे. त्यात तमालपत्र, वेलची आणि लवंगा घालून काही सेकंद परतावे. नंतर त्यात उभा चिरलेला कांदा घालून मिडीयम हाय गॅसवर ५ मिनीटे किंवा लालसर होईस्तोवर परतावे. नंतर त्यात आलं आणि हिरव्या मिरच्या घालून परतावे.
४) आता पिळून घेतलेली मेथी घालून २ मिनीटे परतावे. त्यात घोटून घेतलेले दही घालून ढवळत राहावे. दही घट्टसर झाले कि त्यात उकडलेले कॉर्न घालावे. छान मिक्स करून पाणी घालावे. मीठ घालावे आणि चव पहावी. पाण्याला उकळी येऊ द्यावी.
५) एकदा पाणी उकळू लागले कि त्यात धुतलेले तांदूळ घालावे. मध्यम आचेवर, झाकण न ठेवता तांदूळ शिजू द्यावे. ६० % पर्यंत तांदूळ शिजेपर्यंत झाकण ठेवू नये. नंतर झाकण ठेवून मंद आचेवर तांदूळ पूर्ण शिजू द्यावा. फक्त गरज असेल तेव्हाच हलक्या हाताने भात ढवळावा. खुप जास्तवेळा ढवळू नये, त्यामुळे भाताची शिते तुटतात आणि भात निट बनत नाही.
भात व्यवस्थित शिजला कि वरून १ टेस्पून तूप घालावे आणि हलक्या हाताने सर्व्हींग प्लेटमध्ये वाढावा. फ्लेवरसाठी थोडी कसूरी मेथी भुरभूरावी. थोडी कोथिंबीर पेरून सजवावे.

टीप:
१) आवडीनुसार मेथीचे प्रमाण कमीजास्त करावे.

Labels:
methi corn pulao, Pilaf, Corn Pulav

Related

Rice 6313852102454789855

Post a Comment Default Comments

  1. वा, छानच आहे नवीन प्रकारचा पुलाव.

    ReplyDelete
  2. Kharach kaahi tari vagla prakar aahe......

    ReplyDelete
  3. khup chan zala pulav navin prakarmast aahe
    ya madhe methi shivay dusare kahi ghalu shakto ka

    ReplyDelete
  4. Hi Shrutika
    commentsathi thanks.. vatlyas palak ghalu shakto..

    ReplyDelete
  5. माझे सासरे फार दर्जी आहेत चवींच्या बाबतीत कारण ते 30-35 वर्षे हॉटेल व्यवसायात आहेत. काल हा पुलाव केला होता खास त्यांच्यासाठी. आणि त्यांना फार आवडला. छान दाद मिळाली त्यांच्या कडून...Thanks to you .

    ReplyDelete
  6. Hi Hya madhe varun kasuri methe nahi ghatali tar chalel ka ? chavit badal hoto ka ?

    ReplyDelete
  7. @Anonymous,

    Kasoori methi swadakarata aahe. jar avadat nasel, tar chavit khup asa farak padat nahi.

    ReplyDelete
  8. Hi Shilpa

    Pani ghalto tevha tyatach mith ghalave. recipe update keliye.

    ReplyDelete
  9. Hi Vaidehi,
    Aaj try keli recipe.. mast zali hoti

    ReplyDelete
  10. Tried this recipe..Mast zhali..saglyanna khup aavadli..Thanks !!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्राजक्ता

      Delete
  11. maza kuthlach pulav mokla hot nahi, khichadi sarkha hoto....kahitari tips sangal ka jenekarun bhatachi shite mokli rahtil?

    ReplyDelete
    Replies
    1. पुलावसाठी जुना बासमती तांदूळ वापरावा. तसेच पाणी बेताचे घालावे. पुलाव शिजत असताना सारखे ढवळू नये त्यामुळे भाताचा गचका होतो. दही किंवा थोडा लिंबाचा रस घातल्यास पुलाव मोकळा होतो.

      Delete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item