कैरीचे इंस्टंट गोड लोणचे - Sweet Mango Pickle
Instant Mango Pickle in English वाढणी: ३/४ कप साहित्य: १/२ ते पाउण कप साल काढलेल्या फोडी (१ सेमी आकाराच्या फोडी) १/२ कप किसलेला गूळ १...
https://chakali.blogspot.com/2009/02/sweet-and-sour-mango-pickle.html?m=1
Instant Mango Pickle in English
वाढणी: ३/४ कप
साहित्य:
१/२ ते पाउण कप साल काढलेल्या फोडी (१ सेमी आकाराच्या फोडी)
१/२ कप किसलेला गूळ
१ टेस्पून लाल तिखट
१ टिस्पून मिठ
फोडणीसाठी: १ ते दिड टेस्पून तेल, १/२ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
कृती:
१) फोडींना आधी १० मिनीटे मिठ चोळून ठेवावे.
२) गूळ एका पातेल्यात घेऊन त्यात एक टेस्पून पाणी घालावे. गूळ पातळ करावा. गूळ पातळ झाला कि लगेच गॅसवरून उतरवावा, कोमट होवू द्यावा. गूळ कोमट झाला कि फोडींवर घालावा, तिखट घालावे आणि ढवळावे.
३) कढल्यात फोडणी करताना, तेल गरम करावे त्यात मोहोरी, हिंग व हळद घालावी. हि फोडणी जरा कोमट झाली कि लोणच्यात घालावी.
हे लोणचे फार दिवस टिकत नाही त्यामुळे थोड्या प्रमाणातच करावे.
Label:
Mango Pickle, Kairiche Lonache, Tangy Pickle

Vaidehi, lonache mast disat aahe..Tondala pani sutale
ReplyDeleteHi!Vaidehi,
ReplyDeleteThis is a very nice & tasty lonache.My son like this recipe very very much.Limbache sweet lonache yach pramane kele tar chalel ka?.......... Smita
Thanks Smita,
ReplyDeletelimbache god lonchyachi recipe - the click kar