शेजवान पोटॅटो - Schezwan Potato

Schezwan Potato in English वाढणी: ४ जणांसाठी साहित्य: ३ मध्यम बटाटे (Know more - Is Potato bad for health? ) २ टिस्पून तिळ २ टेस्पून ...

Schezwan Potato in English

वाढणी: ४ जणांसाठी

Schezwan sauce, Indo-chinese food, schezwan fried rice, schezwan potato stir fryसाहित्य:
३ मध्यम बटाटे (Know more - Is Potato bad for health?)
२ टिस्पून तिळ
२ टेस्पून शेंगदाणे Schezwan Sauce, shejvan sauce, shejwan sauce
१/२ टिस्पून जिरे
१/२ टिस्पून विनेगर
१/४ टिस्पून सोयासॉस
१ टेस्पून शेजवान सॉस किंवा २ टेस्पून Ching's Secret Schezwan sauce (रेडीमेड)
४ टेस्पून तेल
१/२ टिस्पून लाल तिखट
२ लाल मिरच्या
मिठ चवीनुसार
१ टेस्पून कांद्याची हिरवी पात सजावटीसाठी

कृती:
१) बटाटे शिजवून सोलून घ्यावेत. प्रत्येक बटाट्याचे मोठे तुकडे करून घ्यावेत (प्रत्येकाचे ६ ते ८ तुकडे). नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करावे, त्यात बटाट्याचे तुकडे घालून परतावे. बटाटे चांगले ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्यावेत, करपू देवू नयेत. बटाटे शालो फ्राय करून झाले कि पेपर टॉवेलवर काढून ठेवावेत. गरम असतानाच यावर मिठ आणि लाल तिखट (टीप १) भुरभूरवावे आणि हलक्या हातांनी मिक्स करावे.
२) मध्यम आचेवर उरलेल्या तेलात शेंगदाणे घालून तळून घ्यावेत. शेंगदाणे पेपर टॉवेलवर काढून ठेवावेत आणि त्याच तेलात जिरे आणि तिळ घालावेत. तिळ थोडे गुलाबी रंगाचे झाले कि लगेच लाल मिरच्या (टीप १) आणि फ्राय केलेले बटाटे घालावेत आणि मिक्स करावे. वरून शेजवान सॉस, सोयासॉस आणि विनेगर घालून मिक्स करावे. गॅस बंद करावा. सजावटीसाठी १ टेस्पून कांद्याची हिरवी पात बारीक चिरून घालावी.

टीप:
१) जर घरगुती शेजवान सॉस (दिलेल्या कृतीनुसार) वापरणार असाल तर लाल तिखट किंवा लाल मिरच्या वापरू नयेत कारण घरगुती सॉस व्यवस्थित तिखट असल्याने अजून तिखटपणा वाढवावा लागणार नाही.

शेजवान सॉस


Labels:
Schezwan Potato, Shezwan Sauce Potato

Related

Snack 7714862110471352732

Post a Comment Default Comments

 1. एकदम टेस्टी डिश आहे ही. :)

  ReplyDelete
 2. धन्यवाद मदनबाण

  ReplyDelete
 3. Hi Vaidehi
  Batate shijavun ghyayache ki ukdun?

  ReplyDelete
 4. Hi Renuka,
  Diwalichya hardik shubhechha!!
  Shijavun mhanjech ukadun ghyayche ase mala mhanayche ahe varchya recipe madhye

  ReplyDelete
 5. raav jaam bhari bhari recepie ahet ya ani mi swatha hotel managment cha course karat ahe, mast ahe hi site admin la khup khup shubhekchha....

  ReplyDelete
 6. schezwan rice kinva chinise bhel krtana schezwan souce cha jagi ching's secret cha schezwan souce takla tr chalel ka...?
  chav bighte ki kayam aste...?

  ReplyDelete
 7. Hi Durga

  Chings secret cha schezwan sauce vaparla tari chalel.

  ReplyDelete
 8. shubhechhanasathi khup dhanyavad Durga

  ReplyDelete
 9. हि पाककृती रेडीमेड रेड करी पेस्ट वापरून आणि त्यात दाण्याचं कुट टाकून करता येईल का ?

  ReplyDelete
 10. readymade schezwan sauce vaparun karu shakto

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item