पाइनॅपल मँगो सलाड - Pineapple Mango Salad

Pineapple Mango Salad in English वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १/४ कप अननसाचे लहान तुकडे ३/४ कप आंब्याचे पातळ उभे काप (आंबा आधी सोलून घ्...

Pineapple Mango Salad in English

वाढणी: २ जणांसाठी

ananasache salad, pineapple raita, healthy salad recipe, fruit salad, Mango salad
साहित्य:
१/४ कप अननसाचे लहान तुकडे
३/४ कप आंब्याचे पातळ उभे काप (आंबा आधी सोलून घ्यावा)
१/२ टिस्पून लिंबाचा रस
१/८ टिस्पून चाट मसाला
१/८ टिस्पून काळे मिठ
१/८ टिस्पून मिरपूड
१ टिस्पून कोथिंबीर, बारीक चिरून
१/८ टिस्पून सुक्या लाल मिरचीचा चुरा
चवीपुरते मिठ
सजावटीसाठी १ लेट्युसचे पान

कृती:
१) एका वाटीत लिंबाचा रस, चाट मसाला आणि काळे मिठ मिक्स करावे.
२) एका वाडग्यात अननसाचे चौकोनी तुकडे आणि आंब्याच्या कापट्या हलक्या हाताने मिक्स करावे. लिंबूरसाचे मिश्रण यात घालून हळू हळू मिक्स करावे. चव पाहून गरज पडल्यास मिठ घालावे.
३) सर्व्हींग प्लेटमध्ये लेट्युसचे पान ठेवावे त्यात तयार सलाड घालावे. मिरपूड आणि कोथिंबीरीने सजवावे. तासभर फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

Labels:
Pineapple Salad, Mango Pineapple Salad, Tangy Mango Salad

Related

Salad 9053276615493120419

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item