सोया ग्रॅन्युल्स कटलेट - Soya Cutlet

Soya Granules Cutlet in English साहित्य: १ कप न्युट्रेला सोया ग्रॅन्युल्स (मी रूची ब्रँडचे सोया ग्रॅन्युल्स वापरले होते) १ कप उकडलेला ...

Soya Granules Cutlet in English

Cutlet, Soya Cutlet, Healthy Cutlet, Vegetable Cutlet, Indian Snack, Savory Snack, Tea time snack
साहित्य:
१ कप न्युट्रेला सोया ग्रॅन्युल्स
(मी रूची ब्रँडचे सोया ग्रॅन्युल्स वापरले होते)
१ कप उकडलेला बटाटा, किसून
१/२ कप वाफवलेले मटार
१ किसलेले गाजर
७-८ वाफवलेली फरसबी, बारीक चिरून
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
१ टिस्पून जिरेपूड
१/४ कप कांदा, पातळ उभा चिरून
१ टिस्पून आले पेस्ट
५-६ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
६-७ कढीपत्ता
२ टेस्पून बेसन
१ टिस्पून तेल
चवीनुसार मिठ
१/२ कप भाजलेला रवा
शालो फ्राईंगसाठी तेल

कृती:

१) ३ ते ४ कप पाणी उकळत ठेवावे. त्यात १ टिस्पून मिठ आणि १ कप न्युट्रेला ग्रॅन्युल्स आणि घालून ५ मिनीटे मध्यम आचेवर उकळवावे. नंतर हे ग्रॅन्युल्स चाळणीत काढून १० मिनीटे निथळत ठेवावे. १-२ वेळा थंड पाण्याने धुवून घ्यावे. पाणी निथळून गेले कि ग्रॅन्युल्स हाताने पिळून घ्यावेत. पाणी राहू देवू नयेत.
२) नॉनस्टिक पॅनमध्ये १ टिस्पून तेल गरम करावे त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, आले पेस्ट घालावी. काही सेकंद परतून कांदा घालावा. कांदा परतला गेला कि त्यात बेसन घालून मंद आचेवर परतावे. बेसन निट परतले गेले कि हे मिश्रण दुसर्‍या वाडग्यात काढून ठेवावे.
३) एका मोठ्या भांड्यात शिजवलेले ग्रॅन्युल्स, उकडलेला बटाटा, वाफवलेले मटार, किसलेले गाजर, फरसबी, कोथिंबीर, जिरेपूड, बेसनाचे मिश्रण आणि चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे. वाटल्यास थोडे लाल तिखट घालावे. निट मिक्स करावे.
४) वरील मिश्रणाचे मध्यम आकाराचे चपटे कटलेट करावे. भाजलेल्या रव्यामध्ये घोळवून, मध्यम आचेवर हे कटलेट शालो फ्राय करावेत.

टीप:
१) जर लसणीचा फ्लेवर आवडत असेल तर १/२ टिस्पून लसणीची पेस्ट फोडणीत घालावी.
२) भाजलेल्या रव्याऐवजी कोटींगसाठी ब्रेड क्रम्ससुद्धा वापरू शकतो.

Labels:
Nutrela Granules, Soya Granules Cutlet, Healthy Cutlet

Related

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

चॉको सोया स्मूदी - Choco Soya Smoothie

Choco-Soya Smoothie in English वेळ: १० मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: दिड कप सोया मिल्क अर्धं केळं २ टिस्पून कोको पावडर १/४ टिस्पून चॉकलेट इसेंस साखरेचा पाक गरजेनुसार गर्निशिंगसाठी - किसलेले चॉक...

Soybean Chilli

Soya Chunks Chilli in Marathi Time: 35 minutes Makes: 2 to 3 servings Ingredients: 1 cup Soya chunks 2 medium onions 1 medium bell pepper 2 tbsp chopped cilantro 1 green chili, crushed 3 tsp garl...

Post a Comment Default Comments

  1. Wow! sounds interesting. Mazya kade soya granules asech padle aahet, hi recipe ekdam mast aahe, try kareen!

    ReplyDelete
  2. nakki try kar.. ani kalav kashe zale te cutlets

    ReplyDelete
  3. i would like to print the receipes, but donot see the option online. is there a way to print a specific receipe?

    thanks

    ReplyDelete
  4. Hi

    there is a printer icon below this recipe. click on that and print the recipe

    ReplyDelete
  5. Hi Vaidehi,

    Nice recipe! He cutlets freezermadhe thewta yetil ka (half cook karun)? ka tyasathi kahi ajun add karawa lagel? Kiti diwas tiktil kahi idea ahe ka tula? Please let me know. Ainweli khayla bare padtil!

    Swati

    ReplyDelete
  6. नमस्कार स्वाती,
    हो, फ्रिजरमध्ये ठेवता येतील साधारण १० ते १५ दिवस राहातील चांगले. कटलेट हवेवर पूर्ण गार होवून ते फ्रिजरमध्ये चालतील अशा प्लास्टिक डब्यात सेपरेट राहतील असे ठेव.
    फक्त एक काळजी घे, यामध्ये सोया ग्रान्युअल्स वापरले असल्याने फ्रोजन कटलेट्स तव्यावर गरम केल्यास ते क्रम्बल होवू शकतात. अशावेळी बनवतानाच थोडा जास्त बटाटा किंवा ब्रेड क्रम्ब्स घाल म्हणजे कटलेट चांगल्याप्रकारे होल्ड करतील.
    तसेच फ्रोजन कटलेट ओव्हन किंवा मायक्रोवेवमध्येही रिहीट करू शकतो

    ReplyDelete
  7. can we soya flour instead of granuals?

    ReplyDelete
  8. Hi Vaidehi,
    Nice receipe me nakki try krun baghen. vaidehi soya granuals vaprun veg kheema banvta yeilna receipe asel tr plz post krna?

    Regards,
    Meghna

    ReplyDelete
  9. Hello Meghana,
    me nakki post karen..

    ReplyDelete
  10. hi Vaidehi,
    mi barechda tujhya recipe ghari try karte aani saglyana aavdi ne khatana baghun anand hota,all credit goes to u,thank you so much,dear!!!
    mugdha

    ReplyDelete

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Search Recipes

RecentCommentsPopular

Recent

Daliya Kheer

Time: 15 to 20 minutes Portion: 1 portion  Ingredients: 30 gm Daliya (Cracked Wheat) 30 gm Jaggery ¼ tsp Cardamom Powder 30 ml Milk 5 ml Ghee 15 gm Fresh Coconut scraped Description: 1. Pressure...

Soya Granules Upma

Soya Granules Upma Time: 10 to 15 minutes Serving: 1  Ingredients:  35 grams Soy Granules 1 tsp Ghee ¼ tsp Cumin seeds Pinch of Hing 4 to 5 Curry leaves 1 or two Green Chilli, finely ...

स्टफ पोटॅटो बोट्स - Stuffed Potato Boats

Stuffed Potato in English वेळ: २५ मिनीटे २ ते ३ जणांसाठी साहित्य: ४ बटाटे (कच्चे) तळण्यासाठी तेल स्टफिंगसाठी २५० ग्राम पनीर १/२ चमचा चाट मसाला थोडेसे मीठ इतर साहित्य: १/२ वाटी स्वीट कॉर्न, वाफवून...

Stuffed Potato Boats

Potato Boats in Marathi Time: 25 minutes Yield: 2 to 3 servings Ingredients: 4 medium potatoes Oil for frying ::::For Stuffing:::: 250 gram paneer 1/2 tsp chaat masala Salt to taste ::::Other Ing...

Boondi Ladu

Boondi Ladu वेळ: ३० ते ४० मिनीटे वाढणी: ८ मध्यम लाडू साहित्य: १ कप बेसन १ कप साखर वेलची पूड केशर तळण्यासाठी तूप किंवा तेल बुंदी पाडायला आणि तळायला असे दोन झारे कृती: १) बेसनात १ चमचा तूप घालाव...

Comments

Vaidehi Bhave:

Nahi. Condense milk ghatta aste. Dudh ghatle tar batter patal hoil. Tasech ha eggless cake ahe.

Vaidehi Bhave:

Thank you for your comment.

Vaidehi Bhave:

Sorry for replying late. Thoda dudh ghalun shijavave. Kadhikadhi naral thoda dry asel tar sakhar virghalat nahi. tyamule thoda olsarpana yayla dudh ghalave.

Like Chakali!

item