फोडणी भात - Phodni Bhat

Phodani Bhat ( English Version ) बरेचवेळा भात उरला कि आपण त्याचा फोडणीभात बनवतो. एखादा पदार्थ नेहमीच्या पद्धतीने न बनवता थोड्या वेगळ्या पद...

Phodani Bhat (English Version)

बरेचवेळा भात उरला कि आपण त्याचा फोडणीभात बनवतो. एखादा पदार्थ नेहमीच्या पद्धतीने न बनवता थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवली तर खायलासुद्धा मजा येते. खाली दिलेली कृती फोडणीभाताचीच आहे पण थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे.

phodani bhaat recipe, phodni bhat recipe, fried rice, instant vegetable rice, leftover rice recipe, veggie rice, spicy rice recipe, marathi rice recipe, marathi fried rice, high carb white rice
साहित्य:
२-३ वाट्या मोकळा भात
१/२ वाटी गाजराचे तुकडे
१ वाटी मटार
१ लहान भोपळी मिरची उभी चिरून
१/४ वाटी फरसबी
३-४ लाल सुक्या मिरच्या
३-४ चमचे तेल
१/२ लहान चमचा हिंग,१ लहान चमचा जिरे
कढीपत्ता
२ चमचे लिंबाचा रस
थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ

कृती:
१) आदल्या दिवशीचा भात असेल तर तो मोकळा करून घ्यावा.
२) सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात. कढईत / नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करावे. हिंग जिरे कढीपत्ता घालून फोडणी करावी. लाल मिरच्यांमधल्या बिया नको असतील तर मिरच्या तोडून त्यातील बिया काढाव्यात. मिरच्या फोडणीत घालाव्यात.
३) फोडणीत आधी मटार आणि फरसबी थोडी परतून २ मिनीटे वाफ काढावी. नंतर भोपळी मिरची आणि गाजराचे बारीक तुकडे घालून वाफ काढावी. भाज्या अर्धवटच शिजवाव्यात, खुप शिजू देवू नयेत. भाज्या शिजताना थोडे मिठ घालावे.
४) नंतर त्यात मोकळा भात घालावा. थोडा परतून वाफ काढावी. लिंबाचा रस घालावा भाज्या शिजताना थोडे मिठ घातलेलेच आहे त्यामुळे आवश्यक असल्यासच मिठ घालावे. कोथिंबीर घालावी
हा भात गरम गरम खायला छान लागतो.

टीप:
१) बर्याचजणांना फोडणी भातात लसणीची चव आवडते तेव्हा फोडणी करताना त्यात १-२ लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात.
२) आवडीनुसार भाज्या घालू शकतो.
३) या भाताच्या फोडणीत थोडे आले ठेचून घातले तरी छान चव येते.

Labels:
Leftover rice recipe, healthy rice recipe, rice and vegetables, fried rice and veggies, Fried Rice, Leftover Rice, Fried Leftover Rice, Phodanicha bhat, phodni bhat

Related

Rice 2663479954191623124

Post a Comment Default Comments

 1. वाफ काढणे म्हणजे - फ्राय करताना झाकणे का?
  आणि फरसबी म्हणजे काय? wikipedia ची link चालेल.
  शिवाय यात खोबरं खिसुन - भात झाल्यावर, कोथिंबीर, लिंबु वगैरे पण भारी लागतं (असा वैयक्तिक अनुभव).

  ReplyDelete
 2. hi Abhijit

  अगदी बरोबर आहे, वाफ काढणे म्हणजेच - फ्राय करताना झाकणे ज्यामुळे पदार्थ शिजण्यास मदत होते.
  फरसबी म्हणजेच French Beans किंवा Green Beans..जर तुम्ही गूगलवर French beans असे सर्च केलेत तर तुम्हाला त्याच्या images सुद्धा मिळतील.
  हि विकीपेडीयाची लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Bean

  ReplyDelete
 3. वर्षा नेहमी चकलीला भेट देतेच पण लिहायचे विसरते. तुझे संस्थ उत्तम चालले आहे. लवकरच काहीतरी वेगळी ऎपेटायझरची कृती शोधायची आहे. तेव्हा परत येऊन हुडकते. :)

  शुभेच्छा!

  ReplyDelete
 4. Mastach yar...mi try kele ...bayko maheri gelyavar upyogi padli hi recipe mala hehe.Bhat okech jhala pahilyanda try karat hoto tyamule but not bad u know.

  ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item