हिरव्या टोमॅटोची भाजी - Hirwa Tomato bhaji

Hirvya Tomatochi Bhaji (English version) साहित्य: २ हिरवे टोमॅटो १ मध्यम कांदा २ टेस्पून सुका किसलेला नारळ १ टेस्पून बेसन १ टिस्पू...

Hirvya Tomatochi Bhaji (English version)


tomato bhaji, tomato bhaaji, kachche tomato, green tomato curry, hirve tomato, hirvya tomatochi bhaji
साहित्य:
२ हिरवे टोमॅटो
१ मध्यम कांदा
२ टेस्पून सुका किसलेला नारळ
१ टेस्पून बेसन
१ टिस्पून आले-लसूण पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून जिरेपूड
२ चमचे चिंचेचा घट्ट कोळ
फोडणीसाठी: १ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, १/४ टिस्पून हिंग, १/२ टिस्पून हळद
१ ते दिड चमचा लाल तिखट
चिरलेली कोथिंबीर
मीठ

कृती:
१) कढईत १ चमचा तेल गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, बेसन व नारळ घालावा. खमंग भाजून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. परतलेला कांदा थंड करावा. थोडे पाणि घालून मिक्सरवर कांदा बारीक वाटून घ्यावा.
२) कढईत २ चमचे तेल गरम करून त्यात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट घालून फोडणी करावी. त्यात तयार केलेले वाटण घालावे. गरज पडल्यास थोडे पाणी घालावे. वाटण जरा गरम झाले कि त्यात धणे-जिरे पूड आणि चिंचेचा कोळ घालावा. टोमॅटोच्या फोडी वाटणात घालून मध्यम आचेवर वाफ काढावी. मिठ घालावे. टोमॅटो शिजले कि भाजीवर कोथिंबीर घालावी व गरम गरम पोळीबरोबर खावी.

टीप : १) जर भाजीला जास्त मसालेदार चव हवी असेल तर आवडीनुसार गरम मसाला किंवा करी मसाला घालू शकतो.

Labels:
Tomato Curry, Tomato curry recipe, Green tomato curry, spicy curry recipe

Related

Tomato 1440998382646329271

Post a Comment Default Comments

  1. ही भाजी मस्तच लागते. कधीतरी केव्हातरी घरी खाल्लेली आहे

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item