पालक परोठा - Palak Paratha
Palak Paratha in English वेळ: ३० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: १ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप) ...
https://chakali.blogspot.com/2007/08/palak-paratha.html
Palak Paratha in English
वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
१ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप)
कणीक
६-७ लसूण पाकळ्या
३-४ तिखट मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून जीरे
चवीपुरते मीठ
तेल
कृती:
१) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.
२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण घालावे. हळद घालावी.
३) त्यात मावेल इतपत कणीक घालावी (साधारण १ ते दीड कप). चवीनुसार मीठ आणि जीरे घालावे.
४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.
५) मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आकाराचे पराठे लाटावेत. परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल किंवा तूप सोडावे.
६) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.
टिपा :
१) आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.
२) पालक चीरण्याऐवजी मिक्सरमध्ये भरडसर वाटू शकतो.
वेळ: ३० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी
साहित्य:
१ जुडी पालक, पाने खुडून घ्यावीत. (बारीक चिरून साधारण २ ते अडीच कप)
कणीक
६-७ लसूण पाकळ्या
३-४ तिखट मिरच्या
१/४ टीस्पून हळद
१ टीस्पून जीरे
चवीपुरते मीठ
तेल
कृती:
१) मिरची आणि लसणीच्या पाकळ्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात.
२) पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. त्यात मिरची-लसणीचे वाटण घालावे. हळद घालावी.
३) त्यात मावेल इतपत कणीक घालावी (साधारण १ ते दीड कप). चवीनुसार मीठ आणि जीरे घालावे.
४) अगदी थोडे पाणी घालून मळावे. जास्त पाणी घालू नये कारण मळताना पालकाचे सुद्धा पाणी निघते, जर गोळा सैल झाला तर गरजेनुसार कणीक वाढवावी. मिश्रण एकजीव झाले की त्यात २ टेबलस्पून तेल घालावे. पीठ जास्त वेळ मळावे.
५) मळलेल्या पीठाचे गोळे करून मध्यम आकाराचे पराठे लाटावेत. परोठा गरम तव्यावर टाकावा. बाजूने तेल किंवा तूप सोडावे.
६) दोन्ही बाजूने मध्यम आचेवर भाजून घ्यावा.
टिपा :
१) आवडीनुसार परोठा बटर वर करू शकतो.
२) पालक चीरण्याऐवजी मिक्सरमध्ये भरडसर वाटू शकतो.
Hi Chakali,
ReplyDeleteTuzhya saglya recipes vaachalya...Khup chaan lihtes tu ! I like the way you explain recipes !
Diwali la me tu dilelya chivda kela...It came out very nice..Thanks !
-Sunita
Hi Sunita,
ReplyDeletecomment sathi khup thanks..tumhala recipes avadlya tyabaddal khup chan vatle.. thanks again
Vaidehi, sagaLyaach kRutI uttam aahet tumachyaa. photo detaa mhaNaje sagaLa.n karun paN baghataa. mhaNUn jaastach viswaasaarh vaaTataat. :)
ReplyDeletepalak paraaThyaabaddal ek saa.ngu kaa? aaine kelele palak parathe chavadaar tar asataatach paN maU mulaayam hotaat. ti nehami chamachaabhar dahI ghaalate pITh maLataanaa. aaNi chimuTabhar ovaa paN.
paalak telaavar jaraasaa vaaphavun paN chhan laagato.
tulachyaa paanaavr yeUn he aagaaU salle dyaayache navhate. paN.. :)
Hello,
ReplyDeletePalak paratha recipe is too good ..I tried it...my husband liked it very much...thanks.
thank you for the comment :)
ReplyDeleteHi Vaidehi,
ReplyDeletehow can i check for the palak paratha recipe in english.pls guide.
Thanks and keep up the good work.
Regards,
kanda nahi ghatala tar hya madhe
ReplyDeleteHo kanda nahi ghatla tari chalel
ReplyDeletegood yaar
ReplyDeletehi sunita tuzya saglya recpes mala avadlya pan pakatil besan ladu mala barobar nahi vatlya karan tup jara jastach asalyamule te bastil ase vatate tari tyat tup kami ghatle ter chalel kan?
ReplyDeletehi chakali
ReplyDeletemala cooker madhe cake agdi perfect banvaila shikaicha ahe tya sathi mala kahi tips havya ahet jya me nehmi lakshat theven.
Namaskar Pallavi,
ReplyDeletepressure cookermadhil cake chya recipesathi ithe click kar yat tula detail recipe ani tips donhi miltil
खुप छान ही रेसिपि करतान आनि खाताना पण खुपच मजा आलि आजपर्यंत कधिच कसलिहि पाककृति केलि नव्हति पन आज रविवार आसलेने मि एकटाच घरि होतो म्हनून सहजच काहितरी करायचे म्हनून तुमची हि पराठ्याचि पाककृति वाचलि आनि करायला गेलो पण आगदि देशोदेशिचे नकाशे तयार झाले त्यातहि कूठे कच्चे कूठे पक्के व्वा पण काहि का आसेना परत कधि तरी करून पाहिन....
ReplyDeletepan palak cha kacha vaas nahi yenar ka ?
ReplyDeleteHi,
ReplyDeleteparathyache kanik ratrich banvun freez madhe tevale tar chalel ka?
kal mi kobi ani palkachi vadi banavali hoti khup chan jhali hoti..........thanks for recipe
Preeti
Hello Preeti
DeletePalak chirun tyala adhi mith lavun 1/2 taas thev. nantar hatane kuskar mhanje tyata pani sutel.baki sarv sahitya ghaal.garajepurate pani ghal ani kanik mal. thoda ghatta gola mal. karan fridge madhye thevalyavar pith thode sail hote. dusarya divashi paratha laatshil teva korde pith thode jast ghyayla lagu shakte.
Thank you so much for reply .
ReplyDeleteKobi paratha recipe sangu shakal ka ?
ReplyDelete