नाचणीची वडी - Nachanichi Wadi

Raagi Flour Wadi in English वेळ: १५-२० मिनिटे वाढणी: २५ मध्यम वड्या साहित्य: १/२ कप नाचणीचे पीठ १ कप कणिक (इतर पौष्टिक पिठेही वापर...

Raagi Flour Wadi in English

वेळ: १५-२० मिनिटे
वाढणी: २५ मध्यम वड्या


साहित्य:
१/२ कप नाचणीचे पीठ
१ कप कणिक (इतर पौष्टिक पिठेही वापरू शकतो जसे सोयाबीनचे पीठ)
१/२ कप तूप (थोडे जास्त लागू शकते)
१/४ कप जाड पोहे
१/४ कप डिंक
१/४ कप जाड किसलेलं सुकं खोबरं (कोरडे भाजून )
१/२ टिस्पून वेलची पावडर
३/४ कप गूळ (बारीक किसलेला किंवा चिरलेला)

कृती:
१) कढईत तूप वितळवून घ्यावे. त्यात पोहे आणि डिंक वेगवेगळे तळून घ्यावे. एका ताटलीत काढून ठेवावे आणि थोडे चुरून घ्यावे एका ट्रेला तूप लावून तयार ठेवावा
२) त्याच तुपात नाचणीचे पीठ आणि कणिक मंद आचेवर भाजावी. पीठं अगदी कोरडी भाजू नयेत. तूप घालून सुद्धा पीठं कोरडी दिसत असतील तर तूप घालावे. पीठं भाजल्याचा छान वास आला की मिश्रण ताटलीत काढून ठेवावे.
३) किसलेला गूळ आणि २-३ टेस्पून पाणी एकत्र करून मध्यम आचेवर गुळ वितळवून घ्यावा. ही कृती करताना सतत ढवळत राहावे. गूळ पूर्णतः वितळला कि आच मोठी करून एक उकळी येउ द्यावी. आणि लगेच आच बंद करावी. त्यात भाजलेली पीठे, डिंक, पोहे, भाजलेलं खोबरं, आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करावे. हे मिश्रण ट्रेमध्ये ओतावे. १ सेंमीचा थर बनवावा. कालथ्याने हलक्या हाताने वड्या पाडाव्यात. थंड झाले कि वड्या मोकळ्या कराव्यात.

Related

Sweet 5012088385269446368

Post a Comment Default Comments

  1. kiti diwas chhan rahtil

    ReplyDelete
  2. 1 month nahi ka tikanar ,dinkache and methiche ladu pan 1 month tiktil ka

    ReplyDelete
    Replies
    1. Mahina bhar tiktil ki nahi he nakki sangu shakat nahi.pan 15-20 divas changalya rahtil. pan jar pith kami bhajle gele tar thoda vaas yeu shakto. mhanun pith khamang bhajlele asave.

      Delete
    2. khup chhan vaidehi....

      Delete
  3. Hi, ya vadya apan freeze madhe thevu shakto ka for long lasting..
    ?

    ReplyDelete
    Replies
    1. vadya shakyato kharab hot nahit unless tyala ola haat kiva moisture lagle tar.
      Fridge madhye texture badalte vadyache.. Vatalyas thodya vadya baher thevun bakichya refrigerate kara.

      Delete
  4. Vaidehi, mast navin padartha aahe. Dink naslays karta yeil ka hi wadi or substitute kay vaprata yeu shakel?

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you... dink aicchik ahe, texture denyasathi.. dink ghalavyche naslyas pohe ajun vadhavu shakto..

      Delete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item