हम्मस - Hummus

Hummus and pita bread (English Version) हुम्मुस (Hummus) हा पदार्थ मिडल इस्टमध्ये बनवला जाणारा चटणीसारखा पदार्थ आहे. या पदार्थात काबुली च...

Hummus and pita bread (English Version)

हुम्मुस (Hummus) हा पदार्थ मिडल इस्टमध्ये बनवला जाणारा चटणीसारखा पदार्थ आहे. या पदार्थात काबुली चणे (छोल्याचे चणे) हे मुख्यत्वे वापरले जातात.
हुम्मुसमध्ये "ताहिनी" (Sesame Paste) म्हणजेच भाजलेले तिळ व ऑलिव्ह ऑइल (Olive Oil) एकत्र वाटून केलेली पेस्ट वापरली जाते, पण थोडे बदल करून खालील कृतीत मी फक्त भाजलेल्या तिळाचा वापर केला आहे.
हुम्मुसबरोबर जोडीला पिटा ब्रेड सर्व्ह केला जातो. पिटा ब्रेडच्या कृतीसाठी इथे क्लिक करा.

वाढणी : साधारण १/२ कप

hummus, middle eastern food, hummus pita bread, baking, how to bake, chutney recipe, tahina sauce, tahini, recipe for pita bread, healthy protein food, Mediterranean food, heart healthy recipe

साहित्य:
१-२ लसूण पाकळ्या
३/४ कप मऊसर शिजवलेले काबुली चणे
१ ते २ टिस्पून भाजलेले तिळ
१ टेस्पून लिंबाचा रस
१/४ कप पाणी
१ टिस्पून ऑलिव्ह ऑइल (टीप १)
१/४ टिस्पून मिरपूड
२ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मिठ

कृती:
१) वरील सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. डब्यात बंद करून फ्रिजमध्ये काही तास थंड करावे.

टीप:
१) हुम्मुसमध्ये ऑलिव्ह ऑइल हा महत्त्वाचा पदार्थ आहे. मी ऑलिव्ह ऑइल वापरले नव्हते तरीही चव छान लागली, त्यामुळे आपल्या आवडीनुसार याचा वापर करावा.
२) हुम्मुस २-३ दिवस फ्रिजमध्ये सहज टिकते.

Labels:
hummus, pita bread, dip recipe, how to make hummus, chickpea hummus,hummus without oilve oil

Related

Mediterranean 5696475967614364146

Post a Comment Default Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. धन्यवाद लिंक पाठ्वल्याबद््ल. मी हा पदार्थ पहिल्यांदा दुबईत खाल्ला होता. मुंबई मधे पण "मोशे" मधे खाल्ला आहे. आता तेथे पुण्यत मुलाला हा चाखायला मि्ळत नसल्या मुळे त्याची घरी करण्याची फर्माईस होती. आता बायको घरी करेल .

    ReplyDelete
  3. This is the simplest hummus recipe that I have come across. I like hummus and have always wanted to make it at home. But all the recipes sounded so complicated. This one I am definitely going to try.Thanks.

    ReplyDelete
  4. Me nehmi talayche hummus karan olive oil ghalayala sangitale. Pan hi tip mahatvachi tharli. Me attach hummus kele ani veg wrap khalle.

    Dhanyawad

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item