Panhe (English version)
पन्हे बनविण्याच्या बर्याच पद्धती आहेत. खाली दिलेल्या पद्धतीत पन्ह्याचा तयार गर हा टिकाऊ असतो, ज्यामुळे गर बनवून फ्रिजमध्ये ठेवता येतो आणि गरजेनुसार पन्हे पिता येते.
साहित्य:
दिड कप कैरीचा गर (कृती क्र. १)
२ कप साखर
१ टिस्पून वेलची पूड
चिमूटभर केशर
कृती:
१) साधारण एक मोठी कैरी (साधारण १ ते दिड पौंड) कूकरमध्ये शिजवून घ्यावी. थंड झाली कि साल काढून गर वेगळा काढावा. चाळणीवर हा गर गाळून घ्यावा. चमच्याने घोटून दाटसर गर गाळावा.
२) साखर पातेल्यात घेऊन त्यात साखर बुडेल इतपत पाणी (साधारण १/२ ते पाउण कप)घालून गोळीबंद पाक करावा. पाक तयार झाला कि गॅस बंद करावा. त्यात केशर आणि वेलचीपूड घालावी, कैरीचा गर घालावा. ढवळून घ्यावे. मिश्रण थंड झाले कि काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
३) एक ग्लासमध्ये २-३ टेस्पून मिश्रण घालावे त्यात थंड पाणी घालून ढवळावे व सर्व्ह करावे.
टीप:
१) सर्व्ह करताना किंचीत मिठ घातले तरी छान चव येते
२) शक्यतो कैरी आंबट असावी. जर कैरी आंबट नसेल तर त्याप्रमाणे साखर कमी करावी. तसेच कमी आंबट कैरीचे पन्हे पिताना थोडे लिंबू पिळावे.
Labels:
Panha, Raw mango drink, indian mango drink, panhe recipe, maharashtrian recipe
7 comments
Post a Comment
Dear Readers,
Thanks for visiting Chakali.Your comments are truly valuable!
Please feel free to share your ideas, suggestion, criticism, feedback for my recipes. You can also request a recipe. I'll try to answer you as soon as possible.
If you want to write to me personally, email me at chakalionline@gmail.com.
Subscribe to:
Post Comments (Atom)




Hi Vaidehi,
Mi tumachya 2-3 recipes try kelya ahet.Mast jamalya. pan mi tumhala private email pathavu shakate ka? kahi stupid doubts asatil tar private emailach bara :).Please let me know.
Supriya
Hi Supriya,
thanks for ur comment :) You can email me on chakalionline@gmail.com. me nakki prayatna karen tumche doubts clear karayla
Hey Vaidehi!!
Happen to see ur blog on blogcatalog. And let me tell u ur blog name attracted me to visit your blog.....as i share the same nick name as ur blog name - Chakali (sparrow in gujarati) and the marathi reminds me of Amchi Mumbai.....Aam panha is one of my fav beverages. Thanks for sharing the same.
I am new in food blogging world and lets start our foodie friendship :)
what say??
हाय वैदेही
तुझी पन्ह्याची रेसिपी आत्ताच केली. पण "गोळीबंद" पाक म्हणजे काय ते न समजल्या ने साखर विरघाळून नंतर तीचे परत क्रिस्टल्स तयार झाले आणि माझी गोची झाली. त्यामुळे आता मला न हसता प्लीज़ "गोळीबंद" पाक म्हणजे काय ते सांग.
सोनाली
हाय सोनाली,
साखरेला उष्णता दिल्यावर साखर विरघळते आणि पाक बनतो. अजून उष्णता देत राहीले की त्यातील बहुतांश पाणी आटून जाते आणि 'गोळीबंद'पाक बनतो. बरोबर गोळी बनली आहे की नाही हे बघण्यासाठी वाटीत थंड पाणी घेऊन त्यात एक थेंब पाक टाक . जर त्याची लगेच गोळी वळता आली तर तुझा पाक बरोबर आहे. लगेच गॅस बंद कर. नाहीतर साखर क्रिस्टलाइज़ व्हायला सुरूवात होते.
शक्यतो साखरेच्या अर्ध्या प्रमाणात किंवा त्याहून थोडे कमी पाणी घे. (२ वाटी साखर १ वाटी पाणी)
Sugar temparature stages काही डीटेल्स लिहाले आहेत. Soft ball
हाय वैदेही,
थॅंक्स. आता मला ' गोळीबंद' पाक नक्की जमेल.आणखीन दोन शंका आहेत: 1. मी कैरीचा गर मिक्सर मधून काढला तर चालेल का?
आणि 2.पन्ह्यासाठी कैरी कशी निवडू? परवाची खूप पानचट होती.
प्लीज़ सांग म्हणजे मी पुन्हा नीट पन्हे करून तुला कळविन.
सोनाली
hi