चण्याचे पिठले - Chanyache Pithale

Pithale ( English Version ) साहित्य: ३/४ मध्यम वाटी चण्याचे पिठ १ कांदा ३-४ लसूण पाकळ्या (ऑप्शनल) फोडणीचे साहित्य: मोहोरी, जिरे, हिं...

Pithale (English Version)

maharashtrian recipe, healthy reicpe, pithale recipe, curry recipe, indian curry recipe, low fat food
साहित्य:
३/४ मध्यम वाटी चण्याचे पिठ
१ कांदा
३-४ लसूण पाकळ्या (ऑप्शनल)
फोडणीचे साहित्य: मोहोरी, जिरे, हिंग, १ लहान चमचा हळद, कढीपत्ता
२-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
३-४ आमसुल
२-३ चमचे तेल
मिठ
कोथिंबीर

कृती:१) चण्याचे पिठ पाण्यात गुठळ्या न होता मिक्स करून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून मोहोरी, जिरे हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी करावी. त्यात लसूण पाकळ्या बारीक करून किंवा ठेचून घालाव्यात. बारीक चिरलेला कांदा फोडणीस घालावा.
३) कांदा निट परतला कि गॅस बारीक करून त्यात भिजवलेले चणा पिठ घालावे. लगेच थोडे पाणी घालावे. गुठळ्या न होता ढवळावे. आवश्यक तेवढा पातळपणा ठेवावा. आमसुल आणि मिठ घालून उकळी काढावी.

गरम गरम पिठले तूप भाताबरोबर झकासच लागते.

Labels:
Pithale, Maharashrian Pithale, Zunka Recipe, Pithala Recipe, Pithla Recipe

Related

Maharashtrian 5869988923970193806

Post a Comment Default Comments

  1. We had gone to Aundh, near Satara where we had Pitahle Bhat for the first time in life. We were used to eat Pitale with Bhakari.

    ReplyDelete
  2. चणा पिठाच्या वड्यांची(पाटवड्या ) रेसिपी पोस्ट कराल का, त्यासाठी पिठले घट्ट बनवावे लागते पण तसे करताना त्यात गाठी राहतात. वर दिलेल्या पद्ध्तीने पाटवड्या बनवता येतील का?

    ReplyDelete
  3. Thanks for the extremely delicious receipe... Will definitely make it again!!

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item