केळ्याचे कटलेट - Kelyache Cutlet

वेळ: ३० मिनीटे ८ ते १० मध्यम कटलेट साहित्य: ४ मध्यम कच्ची केळी १ इंच आलं किसून १/२ चमचा वाटलेली हिरवी मिरची पाव वाटी चिरलेली कोथिंब...


वेळ: ३० मिनीटे
८ ते १० मध्यम कटलेट


साहित्य:
४ मध्यम कच्ची केळी
१ इंच आलं किसून
१/२ चमचा वाटलेली हिरवी मिरची
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
१ चमचा धनेजीरे पूड
१/४ चमचा चाट मसाला
१/४ चमचा गरम मसाला
१५-२० बेदाणे
१/२ वाटी ब्रेड क्रम्ब्ज
चवीपुरते मीठ
ब्रेडक्रम्ब्ज बाहेरून कोट करायला

कृती:
१) प्रत्येक केळ्याचे २ तुकडे करावेत. सालासकट कुकरमध्ये ३ शिट्ट्या करून शिजवून घ्यावेत. केळी शिजली की साल काढून आतला गर किसून घ्यावा.
२) किसलेल्या केळ्यात आलं, मिरची, कोथिंबीर, धनेजीरेपूड, चाट मसाला, गरम मसाला, १/२ वाटी ब्रेड क्रम्ब्ज आणि मीठ घालून मळून घ्यावे.
४) छोट्या लिंबाएवढे गोळे करावेत. आतमध्ये १-२ बेदाणे घालून कटलेट तयार करावेत. कटलेटना थोडासा पाण्याचा हात लावून ब्रेड क्रम्ब्जमध्ये घोळवावेत.
गरम तेलात मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
हिरवी चटणी किंवा टॉमेटो केचपबरोबर सर्व्ह करावेत.

टीप:
१) ब्रेड क्रम्ब्ज ब्राऊन ब्रेड पासूनही बनवता येतो. ब्राऊन ब्रेड उन्हात वाळवून मिक्सरमध्ये बारीक करावे.

Related

Snack 5671987953969396240

Post a Comment Default Comments

  1. मस्त दिसतायत cutlets.. यामध्ये corn add केले तर चालतील का ? वैदेही ताई मी तुमचा blogची खूप मोठी fan आहे. मी आतापर्यंत तुमच्या बर्याच रेसिपी केल्या आहेत आणि त्या सगळ्या छान झाल्या होत्या. माझासारख्या खवय्यांना तुमच्या ब्लॉग् चा खूप आधार वाटतो यासाठी मनापासून धन्यवाद.. - प्रज्ञा

    ReplyDelete
    Replies
    1. Dhanyavad Pradnya

      ho yaat corn add kele tari chaltil

      Delete
  2. BREADCHYA EAVJI YAAT RAVA VAPATA YEEAL KA

    ReplyDelete
    Replies
    1. Hello,

      Baher coating sathi bhajlela jaad rava vaparta yeil.. mishranala bandhani sathi rava vaparu nakat. Tyat jar bread crumbs vaparayche nastil tar pohe mixer madhye barik karun tyachi powder vaparavi.

      Delete
  3. Hiii vaidehi
    Me tumchi kelyache cutlet recipe banavli hoti recipe khupach Chan zali ghari sarvana aawadli kharach tumcha recipes khup Chan aahet

    ReplyDelete
  4. Thanks Vaidehi,

    Ekdum mast recipe ! Mazhya ghari saglyanna avadale he cutlets

    ReplyDelete
  5. Hi
    Me samose try kele. Kharacha khoop chaan zale hote

    ReplyDelete
  6. Hello Vaidehi ji
    keli pani ghalun cooker la shijyachi ki pani n ghalta cooker chi shitti kadun.please describe it.

    ReplyDelete
    Replies
    1. cookerchya talala nehmi thevto tasa pani thevaycha. cookerchya aat dabba asto tyat keli nusti thevaychi tya dabbyat pani ghalu nakat.

      Delete
  7. apratim recipe....:)loved it..thanks so much vaidehi...

    ReplyDelete

item