टॉमेटो बेसिल स्पगेटी - Tomato basil Spaghetti

Tomato Basil Spaghetti in English वेळ: २० मिनीटे वाढणी: १ ते २ साहित्य: १०-१५ चेरी टॉमेटो २ ते ३ मोठ्या लसूण पाकळ्या, चिरून १ वाटी ...

Tomato Basil Spaghetti in English

वेळ: २० मिनीटे
वाढणी: १ ते २


साहित्य:
१०-१५ चेरी टॉमेटो
२ ते ३ मोठ्या लसूण पाकळ्या, चिरून
१ वाटी बेसिलची पाने, अख्खीच ठेवावीत.
१५० ग्राम स्पगेटी नुडल्स
२ ते ३ चमचे ऑलिव्ह ऑईल
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
इटालियन हर्ब्ज
चिली फ्लेक्स
चीज (शक्य असल्यास पार्मेजान चीज वापरावे)

कृती:
१) पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. १ ते दिड चमचा मीठ घालावे. स्पगेटी नुडल्स उकळत्या पाण्यात सोडून शिजवून घ्याव्यात (पाकिटावर दिलेल्या कृतीनुसार). चाळणीत काढून त्यावर गार पाणी सोडावे. निथळत ठेवून द्याव्यात.
२) नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लसूण परतावे. त्यावर चेरी टॉमेटो घालून मध्यम आचेवर परतावे. टॉमेटोची स्कीन थोडी सुरकुतली की बेसिलची पाने घालावीत. १५-२० सेकंद परतून शिजलेल्या नुडल्स घालाव्यात.
३) मीठ मिरपूड इटालियन हर्ब्ज आणि चिली फ्लेक्स घालून हलकेच मिक्स करावे.
४) चीज घालून टॉस करावे. लगेच खायला द्यावे.

Related

Pasta 1733491342356034914

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item