तंदुरी मश्रूम्स - Tandoori Mushroom
Tandoori Mushroom in English वेळ: २५ मिनीटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १० मोठे मश्रुम्स १ मध्यम कांदा, मोठे तुकडे १/४ कप दही १ टेस...
https://chakali.blogspot.com/2015/10/tandoori-mushroom.html?m=1
Tandoori Mushroom in English
वेळ: २५ मिनीटे
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१० मोठे मश्रुम्स
१ मध्यम कांदा, मोठे तुकडे
१/४ कप दही
१ टेस्पून कॉर्न फ्लोअर
१/२ टिस्पून तंदुरी मसाला (किंवा गरम मसाला)
१/४ टिस्पून चाट मसाला
१/२ टिस्पून धणेपूड
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हळद
चिमूटभर साखर
चवीपुरते मीठ
थोडे तेल
१ मध्यम कांदा, उभा पातळ चिरलेला सजावटीसाठी
कृती:
१) मश्रुम स्वच्छ करावे. मश्रुमचे मोठे तुकडे करावे.
२) कांदा सोलून मध्यम तुकडे करावे.
३) दही, कॉर्न फ्लोअर, धणेपूड, तंदूर मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला, साखर आणि मीठ एकत्र करून मिक्स करावे. (कसुरी मेथी, चिरलेली पुदिना पेन वगैरे चवीसाठी घालू शकतो.)
४) मश्रुम आणि कांदा यामध्ये घोळवून ठेवावा. ३० मिनिटे ठेवून द्यावे.
५) नंतर स्क्युअर्सवर अरेंज करावे. ४-५ मिनिटे ग्रील करावे. नंतर थोडे तेल लावून परत ग्रील करावे. मश्रुम शिजले की बाहेर काढावे.
६) उभा चिरलेला कांदा सर्व्हिंग प्लेटमध्ये पसरावा. त्यावर मीठ, लाल तिखट आणि लिंबाचा रस घालावा. ग्रील केलेले मश्रूम्स आणि कांदा त्यावर ठेवावा. कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.

MASHRROMS KASE NIVDAVE MALL MADHUN . KITI DIVSAT VAPRAVE
ReplyDeleteMushroom white colorche asavet. tyavar kalpat daag nasave.deth intact asala pahije.. mau padlele, bulbulit mushroom gheu nayet.
Delete