Tilachya Shenga

तिळाच्या शेंगा साहित्य: २-३ शेवग्याच्या शेंगा १/२ वाटी तीळ १/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट २-३ चमचे किसलेलं सुकं खोबरं फोडणी...

तिळाच्या शेंगा




साहित्य:
२-३ शेवग्याच्या शेंगा
१/२ वाटी तीळ
१/२ वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट
२-३ चमचे किसलेलं सुकं खोबरं
फोडणीसाठी: २-३ चमचे तेल, १/४ चमचा मोहोरी, २-३ चिमटी हिंग, १/४ चमचा हळद, १/२ चमचा लाल तिखट आणि कढीपत्ता
१ लहान चमचा गोडा मसाला
१ चमचा किसलेला गूळ (आवडीनुसार कमीजास्त करावा)
१ चमचा चिंचेचा कोळ
चवीपुरते मीठ

कृती:
१) तीळ, खोबरं वेगवेगळे भाजून घ्यावे. मिक्सरमध्ये तीळ, शेंगदाण्याचा कूट, आणि खोबरं यांची बारीक पूड करावी.
२) शेंगांचे ३ इंचाचे तुकडे करावे. वाफवून घ्यावे.
३) कढईत तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात मिक्सरमध्ये वाटलेले मिश्रण घालावे, मध्यम आचेवर परतावे व पाणी घालून थोडे पातळ करावे.
४) त्यात चिंचेचा कोळ, मीठ आणि वाफवलेले शेंगाचे तुकडे घालावे. मंद आचेवर २-४ मिनिटे उकळी काढावी. गुळ घालून थोडावेळ उकळवावे.
भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तिळाच्या शेंगा वाढाव्यात.

टीप:
१) शेंगांऐवजी छोट्या वांग्याचे तुकडे तळून घालू शकतो.

Related

Marathi 4670007173500249416

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item