Corn Tortilla chips
Corn Tortilla Chips in English साहित्य: १ कप मक्याचे पीठ (सकसचे मका पीठ वापरू शकतो) २ टेस्पून मैदा १ टेस्पून तेल चवीपुरते मीठ तळण्या...

साहित्य:
१ कप मक्याचे पीठ (सकसचे मका पीठ वापरू शकतो)
२ टेस्पून मैदा
१ टेस्पून तेल
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल
कृती:
१) मक्याचे पीठ, मैदा, १ टेस्पून तेल आणि मीठ घालून मिक्स करावे. पाणी घालून मध्यम मळावे.
२) मळलेले पीठाचे लिंबापेक्षा थोडे मोठे असे गोळे करावे. कोरडा मैदा लावून पोळी लाटावी.
३) सर्व पोळ्या तव्यावर अर्ध्याकच्च्या भाजून घ्याव्यात. पोळ्या थंड झाल्या की आवडत्या आकारात कापून घ्याव्यात. (कॉर्न चिप्स त्रिकोणी आकारात असतात)
४) तेल तापवून आच मध्यम करावी. चिप्स बॅचेसमध्ये तळून घ्याव्यात.
५) तळलेले चिप्स पेपरवर काढावेत. थोडे कोमट झाले की किंचीत मीठ वरून लावावे (आपण आधीच पीठ मळताना मीठ घातले आहे).
हे चिप्स टॉमेटो सालसा बरोबर छान लागतात.