कडधान्याचे सॅंडविच - Sprouts Grilled Sandwich

Sprouts Grilled Sandwich in English वेळ: २५-३० मिनीटे वाढणी: ३ सॅंडविचेस साहित्य: ६ ब्रेड स्लाईस ३/४ कप मोड आलेली कडधान्यं (मुग मट...

Sprouts Grilled Sandwich in English

वेळ: २५-३० मिनीटे
वाढणी: ३ सॅंडविचेस


साहित्य:
६ ब्रेड स्लाईस
३/४ कप मोड आलेली कडधान्यं (मुग मटकी हरभरे वाटाणे)
१/२ टिस्पून चाट मसाला
१/४ टिस्पून काळं मीठ
१/२ टिस्पून लाल तिखट
पाव वाटी चिरलेली कोथिंबीर
कांद्याच्या चकत्या ३ ते ४
उकडून सोललेल्या बटाट्याच्या चकत्या ३ ते ४
कोथिंबीर मिरची पुदिना चटणी
बटर
चवीपुरते मीठ

कृती:
१) कडधान्यं व्यवस्थित वाफवून घ्यावी. गरम असतानाच ठेचून घ्यावी.
२) त्यात चाट मसाला, काळं मीठ, लाल तिखट आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे. चवीनुसार मीठ घालावे.
३) ब्रेडला बटर आणि चटणी लावावी. त्यावर कडधान्याचे मिश्रण लावावे. वरून बटाटा आणि कांद्याच्या चकत्या ठेवून त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस लावून  सॅंडविच बनवावे.
४) टोस्टरमध्ये ठेवून दोन्ही बाजू गोल्डन ब्राऊन होईस्तोवर टोस्ट करावे. गरमागरम सॅंडविच टॉमेटो केचप आणि हिरव्या चटणीबरोबर खावे.

Related

Snack 6794924146670167230

Post a Comment Default Comments

  1. वैदेही मला प्लीज माझ्या भिशी साठी मेन्यू सुचव ना... सूप ,सॅलड, आणी एखादी डिश...म्हणजे हे सॅंडविचेस किंवा राईस चा प्रकार....असे माझ्या मनात आहे..पण चांगले जमले पाहीजे व आधी करुन ठेवता आले पाहीजे......गरम गरम सर्व्ह करणे कठीण आहे. ८-९ जणींसाठी...(सगळ्या जणी कॅलरी कॉन्शस आहेत अर्थात..... ) :-):-)....गोड काय द्यावे? - अश्विनी

    ReplyDelete
    Replies
    1. सूप - मंचाव सूप / टॉमेटो सूप /
      सलाड - काकडी, टॉमेटो, कांदा, गाजर यांचे पातळ काप. / पास्ता सलाड / ग्रीक सलाड
      सॅंडविचेस - मश्रुम सॅंडविच / सबवे सॅंडविच / क्रिमी व्हेज सॅंडविच
      गोड - स्वीटकॉर्न बासुंदी

      वरील सर्व रेसिपी ब्लॉगवर मिळतील.

      Delete
    2. TUMCHYA RECEPI ITKYA EASY ASTAT NA TYAMULE MALA JEVAN BANYCHI AVAD NIRMAN ZALIYE. THAXQ SO MUCH

      Delete
  2. Thank you Vaidehi, for your menu. My bhishi was a hit! with Manchav Soup, Pasta Salad, sprout Salad, Mushroom Sandwiches and Sweet - Angoor Malai!
    Appreciate your tips.
    Ashwini

    ReplyDelete

item