आईसक्रीम कॉकटेल - Ice cream Cocktail

Icecream Cocktail in English वेळ: १० मिनीटे वाढणी: १ साहित्य: २ स्कूप वॅनिला आईसक्रीम १ स्कूप मॅंगो आईसक्रीम १/२ कप स्ट्रॉबेरी क्रश...

Icecream Cocktail in English

वेळ: १० मिनीटे
वाढणी: १


साहित्य:
२ स्कूप वॅनिला आईसक्रीम
१ स्कूप मॅंगो आईसक्रीम
१/२ कप स्ट्रॉबेरी क्रश
थोडे आंब्याचे तुकडे
पीच मिळाल्यास त्याचे थोडे तुकडे
डेकोरेशनसाठी:
४ ते ५ पिस्ता, बदाम
२ टेस्पून स्ट्रॉबेरी जेलीचे तुकडे
२ टेस्पून ग्रीन जेलीचे तुकडे
२ टिस्पून टूटीफ्रुटी
२-३ ग्लेझ चेरीज (पाकवलेल्या)
१ वेफर बिस्कीट

कृती:
१) मध्यम आकाराचा उभा ग्लास घ्यावा. त्यात तळाला थोडा स्ट्रॉबेरी क्रश घालावा. त्यावर वॅनिला स्कूप घालावा.
२) त्यावर जेलीचे तुकडे, ड्रायफ्रुट्स आणि थोडा अजून स्ट्रॉबेरी क्रश घालावा. फळांचे तुकडे घालावे. थोडे परत वॅनिला आईसक्रीम घालून वर मॅंगो आईसक्रीमचा स्कूप घालावा.
३) सजावटीसाठी १-२ पिस्ता, १ बदाम, टूटीफ्रुटी आणि चेरीज लावावे. कडेने वेफर बिस्कीट खोचून लगेच सर्व्ह करावे.

Related

Sweet 4881349920906282346

Post a Comment Default Comments

  1. Vaidehi
    Please post the recipes of smoothies. Vegetables and fruits. No milk.

    ReplyDelete

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item