पाती कांद्याची भजी - Spring Onion Pakoda

Spring Onion Pakoda in English वेळ: २० मिनीटे वाढणी: ३ ते ४ जणांसाठी साहित्य: अर्धी जुडी पाती कांदा (१२ ते १५ काड्या) १/४ चमचा ओवा ...

Spring Onion Pakoda in English

वेळ: २० मिनीटे
वाढणी: ३ ते ४ जणांसाठी


साहित्य:
अर्धी जुडी पाती कांदा (१२ ते १५ काड्या)
१/४ चमचा ओवा
२-३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरून
१/२ लहान चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१/४ चमचा लाल तिखट
१ वाटी बेसन
१ चमचा तांदुळाचे पीठ
चवीपुरते मीठ
भजी तळण्यासाठी तेल

कृती:
१) कांद्याची पात आणि कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे. त्यात ओवा, चिरलेली मिरची, हळद, हिंग, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करावे. १५ मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
२) नंतर त्यात अंदाजाने बेसन आणि तांदुळाचे पीठ घालून मिक्स करावे. पातीकांद्याला सुटलेल्या पाण्यातच पीठ भिजवावे. अजून जास्तीचे पाणी घालू नये. पीठ चमच्याचमच्याने घालावे, एकदम सर्व घालू नये. थोडे सैल आणि चिकट भिजले पाहिजे.
३) भिजलेल्या पिठाची चव पाहून गरजेनुसार मीठ तिखट घालावे.
४) तेल गरम करून त्यात पिठाची लहान बोंडं तळून घ्यावी. गरमच वाढावी.

Related

Spring Onion 3100494496593140190

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item