पातीकांदा बटाटा करंजी - Patikanda Batata Karanji

Patikanda Batata Karanji in English वेळ: ३० ते ४० मिनीटे ६ ते ८ करंज्या साहित्य: ६ ते ८ पातीकांद्याच्या काड्या १ मध्यम बटाटा १ चमचा...

Patikanda Batata Karanji in English

वेळ: ३० ते ४० मिनीटे
६ ते ८ करंज्या


साहित्य:
६ ते ८ पातीकांद्याच्या काड्या
१ मध्यम बटाटा
१ चमचा तेल फोडणीसाठी, १/४ चमचा जीरे, १/४ चमचा हिंग
१/२ चमचा चाट मसाला
१/२ चमचा धणेपूड
१/४ चमचा जिरेपूड
१/२ चमचा लाल तिखट
२ चिमटी गरम मसाला
२ हिरव्या मिरच्या बारीक चीरून
चवीपुरते मीठ
किसलेले चीज
तळण्यासाठी तेल
पारीसाठी
१ वाटी मैदा
१ चमचा कणिक
१ चमचा तेल मोहनासाठी
२ चिमटी मीठ

कृती:
१) बटाटा उकडून सोलून घ्यावा. सुरीने अगदी बारीक तुकडे करावे.
२) कांद्याची पात आणि त्याचा कांदा दोन्ही बारीक चिरून घ्यावे.
३) पारीसाठी मैदा, कणिक आणि मीठ एकत्र करावे. त्यात १ चमचा गरम तेलाचे मोहन घालावे. पाणी घालून घट्ट भिजवून झाकून ठेवावे.
४) कढईत तेल गरम करून त्यात जीरे आणि हिंग फोडणीस घालावे. त्यात मिरची घालून परतावे. नंतर पाती कांदा आणि मीठ घालावे. परतून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. नंतर बटाटा घालून मिक्स करावे.
५) आच बंद करून त्यात चाट मसाला, धणे-जिरेपूड, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करावे.
६) पारीच्या दिड इंचाचा गोळ्या बनवाव्यात. लाटून त्यात अर्धा ते एक चमचा सारण घालावे. १ चमचा चीज घालावे. पारी बंद करून करंजीचा आकार द्यावा. तेल गरम करून त्यात करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.
टॉमेटो केचप बरोबर सर्व्ह कराव्यात.

Related

Spring Onion 7387816798739634973

Post a Comment Default Comments

  1. apratim distay chavila hi tasich asnar me he nakki karun baghela

    ReplyDelete
  2. चांगली रेसिपी आहे

    ReplyDelete

item