Mac n Cheese Pizza

Mac and cheese Pizza in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: २ मध्यम पिझ्झा बेस अर्धा कप मॅकरोनी १/२ कप मोझरेला चीज २...

Mac and cheese Pizza in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
२ मध्यम पिझ्झा बेस
अर्धा कप मॅकरोनी
१/२ कप मोझरेला चीज
२ टेस्पून चेडार चीज
१ चमचा पर्मिजान चीज
:::व्हाईट सॉससाठी:::
२ सपाट चमचे मैदा
२ चमचे बटर
दोन ते अडीच वाट्या दूध
मीठ,मिरपूड चवीनुसार
इतर साहित्य:
ब्रेड क्रम्ब्ज
टॉमेटो केचप
बटर (पिझ्झा बेसला लावण्यासाठी)
इटालियन सिझानिंग

कृती:
१) उकळत्या पाण्यात १ चमचा मीठ आणि मॅकरोनी घालाव्यात. मऊ शिजेस्तोवर शिजवाव्यात. पाणी काढून टाकावे. थंड पाणी घालून तेही निथळून टाकावे.
२) कढईत बटर मंद आचेवर गरम करावे. त्यात मैदा घालून हलकासा परतावा. दूध घालून ढवळत राहावे. गुठळ्या होवू देऊ नयेत.
३) सॉस थोडा दाट झाला की थोडे सिझनिंग, मीठ आणि मिरपूड घालावी. आच बंद करून चीज आणि मॅकरोनी घालून मिक्स करावे.
४) पिझ्झा बेसला थोडे बटर लावून घ्यावे. त्यावर टॉमेटो केचप पसरवून घ्यावा. मॅकरोनीचे मिश्रण त्यावर पसरवावे. वरून ब्रेड क्रम्ब्ज पेरावे. वरून थोडा गोल्डन होईस्तोवर ग्रील करून घ्यावा.
५) तवा गरम करून घ्यावा. आच मंद ठेवावी, थोडं बटर घालावे. ग्रील केलेला पिझ्झा त्यावर ठेवून तळ थोडा कुरकुरीत करून घ्यावा.
कट करून पिझ्झा लगेच सर्व्ह करावा. वरून रेड चिली फ्लेक्स घालावे.

Related

Pizza 8804896131340613241

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item