मश्रुम सॅंडविच - Mushroom Sandwich

Cheesy Mushroom Sandwich in English वेळ: २० मिनिटे वाढणी २ जणांसाठी साहित्य: २ हॉटडॉग ब्रेड्स १ चमचा बटर १/२ चमचा तेल १५ ते १८ मश्...

Cheesy Mushroom Sandwich in English

वेळ: २० मिनिटे
वाढणी २ जणांसाठी


साहित्य:
२ हॉटडॉग ब्रेड्स
१ चमचा बटर
१/२ चमचा तेल
१५ ते १८ मश्रूम्स, उभे कापून
२ मध्यम कांदे, पातळ उभे कापून
१/२ वाटी किसलेले चीज
१/४ चमचा रेड चिली फ्लेक्स
१ चिमटी मिक्स हर्ब्ज
मीठ आणि मिरपूड चवीनुसार
चिमटीभर साखर

कृती:
१) कढईत तेल गरम करून त्यात बटर घालावे. बटर वितळले की कांदा घालून लालसर परतून घ्यावा.
२) कांदा छान परतला की मश्रूम घालावे. साधारण ४ ते ५ मिनिटे परतून शिजू द्यावे. मिक्स हर्ब्ज, मीठ, मिरपूड, आणि साखर घालून मिक्स करावे.
३) आच मंद करून चीज घालावे. चीज वितळेस्तोवर मिक्स करावे. रेड चिली फ्लेक्स घालून ढवळावे.
४) ब्रेड एक बाजूने कट करावा पण विरुद्ध बाजू कापली जाणार नाही याची काळजी घ्यावी. ब्रेड उघडून त्यात तयार मिश्रण भरून ग्रील करावे. ब्रेड थोडा क्रिस्पी झाला की सर्व्ह करावे.
टॉमेटो केचप किंवा इतर आवडीच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

Related

Sandwich 8434746630646590760

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item