ज्वारीचे थालीपीठ - Jwariche thalipeeth

Jowar Flour Thalipith in English वेळ: २५ मिनिटे २-३ मध्यम थालीपीठे साहित्य: १ कप ज्वारीचे पीठ १ कप पाणी १ मोठा कांदा, उभा पातळ चिरू...

Jowar Flour Thalipith in English

वेळ: २५ मिनिटे
२-३ मध्यम थालीपीठे


साहित्य:
१ कप ज्वारीचे पीठ
१ कप पाणी
१ मोठा कांदा, उभा पातळ चिरून
१/२ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१ टिस्पून मिरची पेस्ट
२-३ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
तेल
चवीपुरते मीठ

कृती:
१) पाणी उकळत ठेवावे. त्यात मीठ, जीरे, हिंग आणि हळद घालून मिक्स करावे. पाण्याची चव पहावी. थोडी खारट असली पाहिजे म्हणजे पीठ घातल्यावर मीठ बरोबर लागेल.
२) पाणी उकळले की त्यात पीठ घालून आच बंद करावी. नीट मिक्स करून लगेच झाकण ठेवावे.
३) १० मिनिटांनी मळून घ्यावे. मळताना मिरची पेस्ट, कांदा आणि कोथिंबीर घालावी. लागल्यास पाण्याचा हात लावावा. मोठे गोळे करावे.
४) दोन प्लास्टिक पेपरला आतून तेल लावून थालीपीठ लाटून घ्यावे. तेल सोडण्यासाठी २-३ भोकं पाडावी.
५) तवा गरम करून तेल घालावे. थालीपीठ टाकून मंद आचेवर २-४ मिनिटे वाफ काढावी. झाकण काढून आच थोडी वाढवावी. एक बाजू थोडी गोल्डन ब्राऊन होवू द्यावी. वरच्या बाजूवर आधीच तेल लावावे आणि कालथ्याने बाजू पालटावी. दुसरी बाजू खरपूस होवू द्यावी.
दह्याबरोबर किंवा लोण्याबरोबर थालीपीठ सर्व्ह करावे.

Related

Snack 2906869474857829597

Post a Comment Default Comments

  1. Ah...lovely.. mouth is watering.. love thalipeeths and imagine having hot thalipeeth, chaaha on a rainy day

    ReplyDelete
  2. Yum! ... thalipeeth aani garam chaaha on a cold winter day. Soul warming combination. Looks great will try soon

    ReplyDelete
  3. Khupach mast banle hote thalipeeth! Thanks for this amazing recipe with jowar flour!

    ReplyDelete
    Replies
    1. Besan peethachya polya karato na tavyawar pasrun...tase kele tari chaan laagte

      Delete
  4. Tried it for the busy Monday breakfast...
    Too quick and too tasty.
    Your blog is a tremendously helpful.
    Thanks a ton.

    ReplyDelete

item