जीरा आलू - Jeera Aloo

Jeera Aloo in English वेळ: १० मिनिटे वाढणी: ३ जणांसाठी साहित्य: ४ मध्यम बटाटे २ टिस्पून तेल, १/२ ते पाउण टिस्पून जीरे, १/४ टिस्पून ह...

Jeera Aloo in English

वेळ: १० मिनिटे
वाढणी: ३ जणांसाठी


साहित्य:
४ मध्यम बटाटे
२ टिस्पून तेल, १/२ ते पाउण टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून लाल तिखट (काश्मिरी)
५-६ कढीपत्ता पाने
१/२ टिस्पून धणेपूड
२ चिमटी गरम मसाला
चवीपुरते मीठ
चिमुटभर साखर

कृती:
१) बटाटे सोलून मध्यम चौकोन कापावे.
२) कढईत तेल गरम करून जीरे, हिंग, हळद आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी घालून, मिक्स करून  मंद आचेवर वाफ काढावी. मध्येमध्ये ढवळावे.
३) बटाटा अर्धवट शिजला की त्यात गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट, आणि मीठ घालावे. मिक्स करून परत झाकण ठेवून बटाटा शिजवावा. थोडीशी साखर घालून मिक्स करावे. एक वाफ काढून सर्व्ह करावी.

Related

Potato 3544194688426617715

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item