भाताचे थालीपीठ - Bhatache Thalipeeth
Rice Thalipith in English वेळ: २० ते २५ मिनिटे ३ मध्यम थालीपीठे साहित्य: १/२ कप भात (आदल्या दिवशीचा भातही चालेल) (भात मऊ असावा, नसल्...
https://chakali.blogspot.com/2014/09/bhatache-thalipeeth.html?m=1
Rice Thalipith in English
वेळ: २० ते २५ मिनिटे
३ मध्यम थालीपीठे
साहित्य:
१/२ कप भात (आदल्या दिवशीचा भातही चालेल) (भात मऊ असावा, नसल्यास थोडा वाफवून घ्यावा.)
१ मध्यम कांदा, पातळ उभा चिरून
१ टेस्पून आंबट दही
ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ
२ टेस्पून बेसन
१/२ टिस्पून जीरे
१ टिस्पून धणेपूड
१/४ टिस्पून हळद
१/२ टिस्पून हिरवी मिरची पेस्ट
चवीपुरते मीठ
१/४ कप चिरलेली कोथिंबीर
तेल
कृती:
१) जर भात तडतडीत झाला असेल तर त्यावर पाण्याचा हबका मारून मायक्रोवेव्हमध्ये वाफवून घ्यावा. मऊ झालेला भात मळून घ्यावा.
२) यात दही, जीरे, कांदा, कोथिंबीर, हळद, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, २ टिस्पून तेल, बेसन आणि धणेपूड हे सर्व जिन्नस घालून मिक्स करावे.
३) यात मावेल इतके पीठ घालावे आणि मध्यम असे पीठ मळावे. मोठे गोळे करून तव्यावर थापावे. कडेने तेल सोडून मंद आचेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. ३-४ मिनिटे एक बाजू शिजली की झाकण काढावे. आच थोडी वाढवून ती बाजू खमंग करून घ्यावी.
४) नंतर उलथून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यावी.
दह्याबरोबर सर्व्ह करावे.

Kupach Chan urlelya bhatache kay karayche ha prashna sutla thanks on
ReplyDeleteTasty recepie.. I am going to try this sunday
ReplyDelete:P