कॉर्न कोर्मा - Corn Kurma

Corn Korma in English वेळ: २५ मिनिटे वाढणी: २-३ जणांसाठी साहित्य: १ कप स्वीट कॉर्न, वाफवलेले फोडणीसाठी - दिड टेस्पून तेल, १/४ टिस्पू...

Corn Korma in English

वेळ: २५ मिनिटे
वाढणी: २-३ जणांसाठी


साहित्य:
१ कप स्वीट कॉर्न, वाफवलेले
फोडणीसाठी - दिड टेस्पून तेल, १/४ टिस्पून हळद
१/२ कप कांदा, बारीक चिरून
१/२ कप टॉमेटो, बारीक चिरून
२ टेस्पून दही
२ टेस्पून क्रीम किंवा साय
२ वेलची
१/४ टिस्पून गरम मसाला किंवा किचन किंग मसाला
नारळाचे वाटण: १/२ कप ताजा खोवलेला नारळ, ७-८ काजू (मी २ टिस्पून मगजबी वापरली होती), २-३ हिरव्या मिरच्या, ४-५ लसूण पाकळ्या, १/२ टिस्पून किसलेले आलं
चवीपुरते मीठ आणि साखर

कृती:
१) नारळाच्या वाटण करून घ्यावे.
२) कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी, हळद, आणि वेलाचीचे दाणे घाले. नंतर कांदा घालून गोल्डन ब्राऊन होईस्तोवर परतावे.
३) कांदा छान परतला की नारळाचे मिश्रण घालावे. तेल बाहेर येईस्तोवर परतावे. नंतर टॉमेटो घालून मऊ होईस्तोवर परतावे.
४) दही, साय, गरम मसाला, मीठ आणि साखर घालून मिक्स करावे. थोडेसे पाणी घालून कन्सिस्टंसी अड्जस्ट करावी.
झाकण ठेवून ४-५ मिनिटे मंद आचेवर शिजवावे.
गरम सर्व्ह करावे.

Related

Marathi 342769011424693780

Post a Comment Default Comments

emo-but-icon

Search Recipes

Like Chakali!

item