चीकपी पास्ता सूप - Chickpea and Pasta Soup

Chickpeas and Pasta Soup in English वेळ: १०-१५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ३/४ कप शिजलेले काबुली चणे १/४ कप ड्राय पास्ता (शक...

Chickpeas and Pasta Soup in English

वेळ: १०-१५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
३/४ कप शिजलेले काबुली चणे
१/४ कप ड्राय पास्ता (शक्यतो आकाराने लहान)
१ मध्यम टॉमेटो, प्युरी करून
१ मध्यम गाजर, लहान तुकडे
१ टेस्पून ऑलिव ऑईल
४-५ लसणीच्या मोठ्या पाकळ्या, बारीक चिरून
१ टिस्पून रेड चिली फ्लेक्स
१ टिस्पून ड्राईड बेसिल, ओरेगानो आणि थाईम मिक्स्चर
दिड ते दोन कप पाणी
चवीपुरते मीठ

कृती:
१) ऑलिव ऑईल एका पातेल्यात गरम करावे. त्यात चिरलेला लसूण मध्यम आचेवर परतावे.
२) नंतर गाजर घालून मिनिटभर परतावे. टॉमेटो प्युरी घालावी आणि मोठ्या आचेवर मिनिटभर परतावे. आता पाणी, चणे आणि पास्ता घालावा.
३) पास्ता शिजेस्तोवर उकळवावे. पास्ता शिजला कि चिली फ्लेक्स, स्पाईस ब्लेंड आणि थोडे मीठ घालून ढवळावे.
गरमागरम सूप सर्व्ह करावे.

टीपा:
१) कबुली चणे व्यवस्थित शिजलेले असावेत.
२) पास्ता शिजल्यावर लगेच सर्व्ह करावे. जर सूप आधीच बनवून ठेवायचे असल्यास पास्ता न घालता सूप बनवावे. जेव्हा सर्व्ह करायचे असेल तेव्हा पास्ता दुसऱ्या पातेल्यात शिजवून घ्यावा. गाळून घ्यावा. सूपमध्ये घालून मिनिटभर उकळी काढावी आणि मग सूप सर्व्ह करावे. (पास्ता जास्तवेळ सूपमध्ये राहिला तर तो फुगतो.)
३) टॉमेटोला आंबटपणा नसेल तर थोडा लिंबाचा रस घालावा.

Related

Soup 5576968055274127560

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item