स्ट्रॉबेरी मिल्कशेक - Strawberry Milkshake

Strawberry Milkshake in English वेळ: ५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: १५ स्ट्रॉबेरीज १ कप स्ट्रॉबेरी आईसक्रीम १/४ कप थंड दूध ...

Strawberry Milkshake in English

वेळ: ५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
१५ स्ट्रॉबेरीज
१ कप स्ट्रॉबेरी आईसक्रीम
१/४ कप थंड दूध
२ टेस्पून मिल्क पावडर
१ ते २ टिस्पून साखर

कृती:
१) मिल्क पावडर दुधात नीट मिक्स करावी.
२) दूध पावडर+ दूध, साखर, चिरलेल्या स्ट्रॉबेरीज, आणि आईसक्रिम मिक्सरमध्ये फिरवावे.
३) २ ग्लासेस मध्ये ओतावे. स्ट्रॉबेरीच्या चकतीने डेकोरेट करावे. लगेच सर्व्ह करावे.

टीपा:
१) स्ट्रॉबेरीवर बारीक बिया असतात. त्या कधीकधी मिक्सरवर बारीक वाटल्या जात नाहीत. अशावेळी स्ट्रॉबेरी सुरीने हलकेच सोलून घ्यावे.
२) मिल्कशेक तयार झाल्यावर स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे त्यात घालावेत. मिल्कशेक पिताना मधेमधे चांगले लागतात.
३) स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यावर वरती आईसक्रीमचा स्कूप किंवा थोडे व्हिप्ड क्रीम घालू शकतो.

Related

Valentines Day Special 7271916220836275847

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item