रताळ्याची भाजी - Ratalyachi Bhaji
Sweet Potato Sabzi in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ ते ३ जणांसाठी साहित्य: २ मध्यम रताळी (साधारण १/४ किलो) १ टेस्पून तूप १/२ टिस्...
https://chakali.blogspot.com/2014/02/ratalyachi-bhaji.html?m=1
Sweet Potato Sabzi in English
वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ ते ३ जणांसाठी
साहित्य:
२ मध्यम रताळी (साधारण १/४ किलो)
१ टेस्पून तूप
१/२ टिस्पून जीरे
२ ते ३ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
२ हिरव्या मिरच्या, चिरून
२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ
मीठ आणि साखर चवीनुसार
कृती:
१) रताळी धुवून घ्यावी दोन्ही बाजूची टोकं कापून टाकावी. रताळ्याचे लहान तुकडे करावेत.
२) कढईत तूप गरम करावे.. त्यात जीरे आणि हिरवी मिरची घालून फोडणी करावी. १० सेकंदभर परतावे. आता रताळ्याचे तुकडे घालावे. मीठ घालून मिक्स करावे. कढईवर पाण्याचे झाकण ठेवावे. मंद आचेवर रताळ्याचे तुकडे शिजू द्यावे. मधेमधे ढवळावे जेणेकरून रताळी करपणार नाहीत.
३) रताळी शिजली कि त्यात शेंगदाणा कूट, साखर आणि नारळ घालावा. मिक्स करून झाकण न ठेवता; मध्यम आचेवर परतावे.
टीप:
१) जर रताळ्याचे साल कोवळे नसेल तर भाजी करण्यापूर्वी रताळी सोलून घ्यावी.

Will try this soon.
ReplyDeleteJust a typo we all make. Our Hindi teachers badgered us to use the rasva ki for conjunction. Marathi uses only the deergha.
Made this just now, used frozen coconut and peanut butter, came out good. Thanks. Marathi manus.
ReplyDelete