बटर व्हेजिटेबल्स - Buttered Vegetables

Buttered Vegetables in English वेळ: १५ मिनिटे वाढणी: २ जणांसाठी साहित्य: ८ ते १० कॉलीफ्लॉवरचे तुरे ८ ते १० फरसबी १ मध्यम बटाटा, स...

Buttered Vegetables in English

वेळ: १५ मिनिटे
वाढणी: २ जणांसाठी


साहित्य:
८ ते १० कॉलीफ्लॉवरचे तुरे
८ ते १० फरसबी
१ मध्यम बटाटा, सोलून
१ मध्यम गाजर, सोललेले
६-७ बेबीकॉर्न
२ लसणीच्या पाकळ्या, ठेचून
चवीपुरते मीठ
१/२ ते १ टिस्पून सिझानिंग (ड्राय पार्सली, गार्लिक पावडर)
२ टेस्पून बटर

कृती:

१) भाज्या धुवून घ्याव्यात. फरसबी आणि गाजर यांची टोकं काढून टाकावीत. बटाट्याच्या मध्यम फोडी कराव्यात. गाजराचे तिरके काप करावेत.
२) सर्व भाज्या मायक्रोवेव्ह मध्ये वाफवून घ्याव्यात. मायक्रोवेव्हसेफ भांड्यात १/४ कप पाणी आणि सर्व भाज्या घालाव्यात. २-३ मिनिटे वर झाकण ठेवून वाफवावे. नंतर ४-५ मिनिटे तसेच झाकून ठेवावे.
३) पाणी काढून टाकावे. नॉनस्टीक पॅनमध्ये बटर घालून त्यात लसूण घालून परतावे. नंतर वाफवलेल्या भाज्या घालाव्यात. भाज्या मोठ्या आचेवर परताव्यात.
४) रंग थोडा बदलला कि थोडे मीठ आणि सिझानिंग घालावे. काही सेकंद परतून लगेच सर्व्ह करावे.

Related

Marathi 3967670988115450794

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item