भाताचे वडे - Bhatache Vade

Rice Wada in English वेळ: १५ मिनिटे १२ ते १५ मध्यम वडे साहित्य: १ कप भात (शिळा किंवा ताजा कोणताही चालेल) ज्वारीचे पीठ (गरजेनुसार) ...

Rice Wada in English

वेळ: १५ मिनिटे
१२ ते १५ मध्यम वडे


साहित्य:
१ कप भात (शिळा किंवा ताजा कोणताही चालेल)
ज्वारीचे पीठ (गरजेनुसार)
१ टेस्पून तांदुळाचे पीठ
१/२ टिस्पून जीरे, १/४ चमचा हळद
२ टिस्पून मिरचीची भरड पेस्ट
१ टिस्पून धणेपूड
मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
चवीपुरते मीठ
तळण्यासाठी तेल

कृती:
१) भात जर फडफडीत असेल तर पाण्याचा हबका मारून वाफवून नरम करून घ्यावा. मायक्रोवेव्हमध्ये केल्यास पटकन होईल.
२) नरम झालेल्या भातात जीरे, हळद, मिरची, धणेपूड, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करावे. तांदुळाचे पीठ घालावे आणि मळावे.
३) नंतर भातात मावेल इतके ज्वारीचे पीठ चमच्याने घालावे. मळून अंदाजाने पीठ घालावे. (१ कप भाताला साधारण १/२ ते ३/४ कप पीठ लागेल.). थोडे तेल हातावर घेउन गोळा मळावा.
४) पीठाचे एक दिड इंचाचे गोळे करून हातावर थापावे (चिकटू नये म्हणून हाताला थोडे तेल लावून घ्यावे). मधे एक भोक पडून गरम तेलात मध्यम आचेवर तळावेत.
५) लाईट ब्राउन रंग आल्यावर तेलातून काढून टिश्यू पेपरवर ठेवावे. गरमच खायला द्यावे. या वड्यांबरोबर टॉमेटो सॉस, किंवा नारळाची चटणी छान लागते.

टीपा:
१) नेहमी आदल्या दिवशीचा भात उरला कि फोडणी भात करण्यापेक्षा असे वडे केल्यास चवीत बदलही होतो आणि भात आनंदाने संपतो.
२) आवडीप्रमाणे कणिक, बाजरी अशी पीठे घालू शकतो.
३) हे वडे गरमच चांगले खुसखुशीत लागतात. त्यामुळे शक्यतो लगेच खावेत. गार झाले कि मऊ पडतात.
४) लहान मुलांसाठी हे वडे बनवण्यासाठी त्यात मिरची घालू नये. तसेच ताज्या भाताचे बनवावे.

Related

Snack 5599353378734768445

Post a Comment Default Comments

  1. Khupach chan vade jhale aahe ghari saglyana far aavadle thanks vaidahi tujha chakali blog khupch chan aahe.

    ReplyDelete
  2. interesting recipe aahe... try karel ekada :)

    -Kavita

    ReplyDelete
  3. WOW... kiti chan recipe ahe thnx vaidehi tai

    ReplyDelete
  4. मी हे वडे करून पाहिले, आम्हाला फारच आवडले. मी ज्वारीच्या पीठा ऐवजी थालीपीठाची भाजणी घातली होती.

    ReplyDelete
    Replies
    1. कळवल्याबद्दल धन्यवाद जास्वंदी..

      Delete
  5. kalach try keli..mast recipe ahe .. thanx... :)
    tumachyakade bharpur kalya manuka vaprun karnyachi ekhadi recipe ahe ka ? asel tar upload kara na please..

    ReplyDelete
  6. hi vaidhei mam
    me receipe vachli ani ghari try keli. ekdum chan ani khuskushit jhali
    thanks .tuchya receipe chan astat

    ReplyDelete
  7. Hi vaidhai mam

    I tried your receipe Bhatache Vade. Its nice & very easy receipe. ekdam vade khuskhushit jhale.

    Thanks. Tumchya saglya receipe chan astat

    ReplyDelete
  8. easy and kami velat honari receipe ahe..thanks for sharing vaidehi :)

    ReplyDelete
  9. thanks for this recepie

    ReplyDelete
  10. nice and easy recipe will try
    sailee.....

    ReplyDelete
  11. besan ghatle tar kay hoil

    ReplyDelete
    Replies
    1. besan ghatle tari chalel.. pan besanache padarth already aapan khato.. jwari farshi vaparli jaat nahi.. mhanun jwari vaparli ahe tasech jwariche wade apratim lagtat chavila.

      Delete

item