पडवळाचे रायते - Padwal Raita

Padwal Raita in English वेळ: ५ मिनिटे वाढणी: ३-४ साहित्य: ३/४ कप पडवळाच्या चकत्या (आतील भुसभुशीत भाग आणि बिया काढून टाकाव्यात) १/२ ...

Padwal Raita in English

वेळ: ५ मिनिटे
वाढणी: ३-४



साहित्य:
३/४ कप पडवळाच्या चकत्या (आतील भुसभुशीत भाग आणि बिया काढून टाकाव्यात)
१/२ कटे ३/४ कप फेटलेले दही
२ टेस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
१/२ टिस्पून हिरवी मिरची पेस्ट
१ टिस्पून तूप
१/४ टिस्पून जीरे
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
मीठ आणि साखर चवीनुसार

कृती:
१) पडवळ काचऱ्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. हाताने भरडसर कुस्करून घ्याव्यात.
२) त्यात दही, शेंगदाणा कूट, मिरची पेस्ट, कोथिंबीर, साखर आणि मीठ घालून मिक्स करावे.
३) कढल्यात तूप गरम करावे. त्यात जीरे घालून फोडणी करावी. रायत्यात घालून मिक्स करावे.
जेवणात तोंडीलावणी म्हणून सर्व्ह करावे.

Related

Snake Gourd 1507746985870666124

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item