बैंगन कबाब - Vangyache Kabab

Baingan Kabab in English वेळ: २० मिनिटे ६ मध्यम कबाब साहित्य: १/२ कप भाजलेल्या वांग्याचा गर २ टेस्पून गव्हाचे पीठ १ टेस्पून तांदळ...

Baingan Kabab in English

वेळ: २० मिनिटे
६ मध्यम कबाब


साहित्य:
१/२ कप भाजलेल्या वांग्याचा गर
२ टेस्पून गव्हाचे पीठ
१ टेस्पून तांदळाचे पीठ
ज्वारीचे पीठ
२ टिस्पून धनेजीरेपूड
१ टेस्पून मिरची कोथिंबीर पेस्ट
५-६ ठेचलेल्या लसणी
मीठ
तळण्यासाठी तेल
तीळ
कबाब बनवायला १ सेमी जाडीची दांडी (मी ताक घुसळायच्या रवीचा दांडा वापरला)

कृती:
१) २ टिस्पून तेल मध्यम कढईत गरम करावे. त्यात लसूण घालून लालसर होईस्तोवर परतावे. वांग्याचा गर आणि धनेजीरेपूड घालावी. मीठ आणि कोथिंबीर-मिरची पेस्ट घालावी. मंद आचेवर १ मिनिट वाफ काढावी.
२) वाफ काढल्यावर त्यात आधी गव्हाचे आणि तांदळाचे पीठ घालावे. मिक्स करून त्यात मावेल इतके ज्वारीचे पीठ घालावे. पिठाचा गोळा मळता आला पाहिजे.
३) हा गोळा काढून ठेवावा. जी दांडी किंवा सळी वापरणार असाल त्याला तेल लावून घ्यावे.
४) पीठ गार झाले कि लिंबाएवढा गोळा घेउन दांडीवर तो दाबून ३ इंचाचा कबाब बनवावा. कबाब दांडीवर असतानाच तीळ हातात घेवून कबाब त्यात घोळवावा. मग हलक्या हाताने कबाब दांडीपासून सोडवावा. अशाप्रकारे बाकीचे कबाब करून घ्यावे.
५) तेल तापवून त्यात कबाब तळून घ्यावे. हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे. सोबत कांद्याचे पातळ उभे कप, त्यावर मीठ आणि लिंबूरस घालून दिला तरी छान लागते.

टीपा:
१) अशाप्रकारे दुसऱ्या कोणत्याही भाजीचे किंवा मिक्स भाज्यांचे कबाब बनवता येतील.
२) आवडत असल्यास गरम मसालासुद्धा घालू शकतो.

Related

Snack 6505660593135581144

Post a Comment Default Comments

Post a Comment

emo-but-icon

item